आता लवकरच उन्हाळा सुरू होईल. उन्हाळा म्हटलं की आठवते ती गरमी. या ऋतूमध्ये येणारी अनेक फळे उन्हाळा सुसह्य करण्यास मदत करतात. कलिंगड हे फळ उन्हाळ्यात हमखास पाहायला मिळतं. चवीला मधुर आणि थंड असणारे हे कलिंगड अनेकांच्या आवडीचे असते. कलिंगडाचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. कलिंगडाचे गर, बी व साल हे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत. आज आपण कलिंगडाच्या पांढऱ्या भागापासून सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे सांडगे बनवायला अगदी सोपे आणि २ ते ३ वर्ष आरामात टिकतात. चला तर मग जाणून घेऊया कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचे सांडगे बनवण्याची सोपी रेसिपी..

साहित्य

  • कलिंगडाच्या पांढऱ्या गराच्या फोडी
  • आलं लसूण कोथिंबीर पेस्ट दोन चमचे
  • लाल तिखट एक चमचा
  • मीठ चवीप्रमाणे
  • हळद अर्धा चमचा
  • हिंग अर्धा चमचा

( हे ही वाचा: गोड खावसं वाटतंय? झटपट बनवा ‘खजुराची खीर’)

Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना

कृती

  • सर्व साहित्य एकत्रित करून कलिंगडाच्या पांढऱ्या घ्या.
  • गराच्या फोडींना व्यवस्थित लावून घ्या.
  • कडक उन्हात दोन ते चार दिवस वाळवा.
  • वाळल्यावर तळून खा.
  • हे सांडगे दोन ते तीन वर्ष आरामात टिकतात