scorecardresearch

Premium

तुम्ही कधी घरी आंबा पेढा बनवला आहे का? नसेल तर आता करून पाहा, ही घ्या रेसिपी

आंबा पेढा खाऊन सर्वजण तुमचे कौतूक करतील. हा आंबा पेढा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्की आवडेल.

mango peda
आंबा पेढा (photo -The Terrace Kitchen)

फळांचा राजा आंबा हा उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. या हंगामात प्रत्येक घरात आंबा सहज उपलब्ध होतो. लोक आंब्याचे अनेक पदार्थ तयार करतात परंतु त्यात आमरस अधिक वापरला जातो. तुम्ही कधी घरी आंबा पेढा बनवला आहे का? नसेल तर एकदा नक्की तयार करून पाहा. हे पेढा चवीला अप्रतिम लागतो. घरी आलेल्या नातेवाईकांनाही देऊ शकता. हा आंबा पेढा खाऊन सर्वजण तुमचे कौतूक करतील. हा आंबा पेढा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्की आवडेल. चल तर मग जाणून घेऊ या कसा बनवावा आंबा पेढा

आंबा पेढा रेसिपी

साहित्य
आंब्याचा रस – ३/४ कप

vadhavan port in national interest
‘वाढवण’साठी लोकांशी स्वच्छ संवाद हवा
recipe for kids homemade matar rolls
Recipe : मुलांना मटार आवडत नाहीत? मग हा ‘कुरकुरीत’ पदार्थ बनवून पाहा; रेसिपी घ्या
state and central government authority, responsibility, Alibag Vadkhal road, Bad condition
अलिबाग वडखळ मार्ग नेमका कोणाचा? दुरुस्तीच्या कामात यंत्रणांची टोलवाटोलवी
Denial of free blood supply
थॅलेसेमियाग्रस्त मुलांना मोफत रक्तपुरवठ्यास नकार

दूध पावडर – ३/४ कप

कंडेन्स्ड दूध – ३/४

साखर – १/४ कप

रंग – एक चिमूटभर

तूप – ३ चमचे

केसर – १ मोठी चिमूट

वेलची पावडर – १ मोठी चिमूट

बदाम – १०-१२

पिस्ता – सजावटीसाठी

सुका मेवा किंवा चांदीचे फॉइल – सजावटीसाठी

हेही वाचा – काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग बनवा आंबा बर्फी, जाणून घ्या अगदी सोपी रेसिपी

कृती
आंब्याचा पेढा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका जाड तळाच्या कढईमध्ये १ चमचा तूप मंद आचेवर गरम करा. यानंतर कढईत दुध पावडर, कंडेन्स्ड दुध घालून चांगले एकत्र करा. पीठासारखी सुसंगतता येईपर्यंत शिजवा. आता हे मिश्रण एका वेगळ्या ताटात काढा. यानंतर कढईमध्ये साधारण २ चमचे तूप घाला. यासोबत आंब्याचा रस, वेलची पूड आणि केसर घाला आणि मिश्रण सतत ढवळत राहा. आंब्याचा रस थोडी घट्ट होईपर्यंत शिजवा. आता दुध पावडर व कंडेन्स्ड मिल्कचे मिश्रण परत कढईमध्ये टाका आणि चांगले मिसळून घ्या. हळूहळू सर्व साहित्य पातळ होईल.

मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवत रहा आणि नंतर गॅस बंद करा. यानंतर हे मिश्रण एका वेगळ्या ताटात मध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवा. मिश्रण थोडे कोमट झाल्यावर त्याचे छोटे गोळे करा. यानंतर, हलक्या हातांनी चपटा करा आणि त्याच्या मध्यभागी एक संपूर्ण बदाम ठेवा. सजवण्यासाठी केसरचे धागे आणि तुकडे केलेला पिस्ता वापरा. तुमचा आंबा पेढा तयार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Make delicious mango peda with your own hands at home learn the recipe here snk

First published on: 20-05-2023 at 19:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×