How To Make Manchurian Pancake: अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मंच्युरियन खायला प्रत्येकालाच आवडतं. बाहेर स्टॉलवर अनेक व्यापारी मंच्युरियनचे वेगवेगळे पदार्थ त्यांच्या ग्राहकांना खाऊ घालतात. पण , पावसाळ्यात बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी मंच्युरियन बनवता आलं तर… तुम्ही आतापर्यंत मंच्युरियनचे पकोडे, सूप, फ्रँकी नक्कीच खाल्ली असेल. पण, आज आपण मंच्युरियनचे पॅनकेक ( Manchurian Pancake) बनवणार आहोत. चला तर हा पदार्थ कसा बनवायचा याचं साहित्य व कृती लेगच लिहून घ्या.

साहित्य –

१. एक सिमला मिरची
२. एक कांदा
३. एक गाजर
४. कोबी
५.आलं
६. लसूण
७. हिरवी मिरची
८. १/२ चमचा काळी मिरी
९. एक चमचा सोया सॉस
१०. तांदळाचे पीठ
११. तेल
१२. मीठ

हेही वाचा…Sugar Free Coconut Barfi: १५ मिनिटांत करा नारळ, गुळाची बर्फी; हा सोपा पदार्थ कसा बनवायचा ? साहित्य, कृती लिहून घ्या

व्हिडीओ नक्की बघा…

कृती –

१. सिमला मिरची, कांदा, गाजर, कोबी, आलं, लसूण बारीक चिरून घ्या.
२. त्यात काळी मिरी, मीठ, सोया सॉस, तांदळाचे पीठ, पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
३. पुन्हा पाणी घाला आणि पॅनकेकचं बॅटर बनवून घ्या.
४. गॅसवर तवा गरम करायला ठेवा.
५. तयार केलेलं मिश्रण पसरून पॅनकेकचा आकार तयार करा आणि झाकण ठेवून शिजवा.
६. आता ते पलटून दोन्ही बाजूंना थोडे तेल लावून चांगले शिजवून घ्या.
७. अशाप्रकारे तुमचे मंच्युरियन पॅनकेक तयार.

पॅनकेकबरोबर खायला सॉस: साहित्य व कृती

१. एका भांड्यात १/२ चमचा सोया सॉस, एक चमचा रेड चिली सॉस, एक चमचा टोमॅटो सॉस नीट मिक्स करून बाजूला ठेवा.
२. आता एका कढईत थोडे तेल घाला.
३. त्यात चिरलेलं आलं-लसूण परतवून घ्या.
४. नंतर सॉसचे तयार मिश्रण, १/४ कप पाणी, जाडपणासाठी तांदळाच्या पिठाची स्लरी (तांदळाची स्लरी- १/२ चमचे तांदळाचे पीठ घ्या आणि २ चमचे पाणी घाला)
५. व्यवस्थित मिक्स करून घ्या. अशाप्रकारे तुमचा सॉस तयार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियाच्या या @myflavourfuljourney इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही रेसिपी घेण्यात आली आहे.