Sugar Free Coconut Barfi: अनेक जण वजन वाढण्याच्या भीतीने गोड खाण टाळतात किंवा बाजारातून शुगर फ्री मिठाई किंवा पदार्थ घेऊन येतात. पण, तुम्हाला खूप गोड खाण्याची इच्छा असेल. तर तुम्ही घरच्या घरी नारळ आणि गुळापासून एक बर्फी बनवू शकता. तर आज आपण नारळाची बर्फी (Sugar Free Coconut Barfi) कशी बनवण्याची हे पाहणार आहोत. चला तर साहित्य व कृती लगेच लिहून घ्या…

नारळाची बर्फी बनवण्यासाठी तुम्हाला पुढील साहित्य लागेल :

१. तीन चमचे तूप
२. तीन कप किसलेलं खोबरं
३. १.५ कप गूळ
४. १/२ कप मावा
५. एक चमचा वेलची पावडर (आवडीनुसार)

हेही वाचा…Egg Sandwich Recipe: १५ मिनिटांत बनवा ‘अंड्याचे टेस्टी सँडविच’; साहित्य, कृती नोट करून घ्या

नारळाची बर्फी बनवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा –

१. गॅसवर एक पॅन ठेवा.
२. त्यात तीन चमचे तूप घाला.
३. नंतर तीन वाटी किसलेला नारळ टाकून घ्या.
४. त्यानंतर त्यात गूळ, मावा आणि आवडीनुसार एक चमचा वेलची पावडर सुद्धा टाका.
५. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवर १०-१५ मिनिटे शिजवून घ्या.
६. नंतर एका ट्रे मध्ये हे मिश्रण पसरवून ठेवा.
७. वेळाने त्याचे काप करून घ्या आणि वरून सजावटीसाठी एक काजू सुद्धा लावा.
८. अशाप्रकारे तुमची नारळाची बर्फी तयार.

गूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियाच्या @chef_modeon या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही रेसिपी घेण्यात आली आहे. जास्त गोड न खाणाऱ्यांसाठी ही बर्फी बेस्ट ठरेल.
गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो. पण, तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर मानला जातो. कारण गूळ हा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करतो. त्यामध्ये भरपूर लोह उपलब्ध आहे. तसेच तो रक्त शुद्ध करण्यासाठी आणि ॲनिमियाचा सामना करण्यासाठी मदत करतो. कमी ग्लायसेमिक इंडेक्स हा मधुमेहाच्या रुग्णांसाठीदेखील एक चांगला पर्याय ठरतो.