पावसाळ्यात मासेमारीचे प्रमाण कमी असल्यामुळे ताजे मासे कमी प्रमाणात मिळतात त्यामुळे त्याला पर्याय म्हणुन सुके मासे केले जातात. अशीच एक खास रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर पाहूयात सोडे बटाटा मसाला रेसिपी सोडे बटाटा मसाला साहित्य १०० ग्रॅम सोडे२ बटाटे साल काढुन लहान फोडी केलेल्या३० ग्रॅम कांदा, सुके खोबरे, आले, लसुण, गरम मसाला, कोथिंबिर, जीरे ह्यांचे वाटण१/४ टिस्पुन हळद१ टिस्पुन काश्मिरी तिखट२ टिस्पुन घरगुती तिखट४-५ कडिपत्याची पाने१ पिंच हिंग१ टिस्पुन आले लसुण पेस्ट१/२ टिस्पुन जीरे१ टिस्पुन कोकम आगळचविनुसार मीठ२ टेबलस्पुन तेल१ टिस्पुन कोथिंबिर सोडे बटाटा मसाला कृती १. सर्वात प्रथम सोडे १५ मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. नंतर स्वच्छ धुवुन घ्या बटाट्याचे साल काढुन बारीक चिरून घ्या. नंतर वाटणासाठी ३ कांदे उभे चिरून कढईतील तेलात परतुन घ्या. २. त्यातच आले लसुण जीरे परतुन घ्या. नंतर कांदा गोल्डन होईपर्यंत परतून घ्या आणि कांदा थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढा. मग त्यातच कोथिंबिर व भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची व भाजलेल्या खडे मसाल्याची मिक्स पावडर घ्या व त्यात थोडे पाणी मिक्स करून पेस्ट करून ठेवा ३. पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यावर सोडे परतुन घ्या नंतर बटाटाच्या फोडीही प्लेटमध्ये काढुन ठेवा. पॅनमध्ये जास्त तेल गरम करून त्यात जीरे, कडिपत्ता, हिंग परतुन त्यात तयार वाटण, हळद, घरगुती तिखट, काश्मिरी तिखट आलेलसुण पेस्ट मिक्स करून चांगले परतुन घ्या. ४. तेल सुटेपल्यानंतर त्यात सोडे व बटाटा टाकुन परतुन घ्या. आवश्यकते प्रमाणे गरमपाणी व मीठ मिक्स करून झाकण ठेवुन ५-१० मिनिटे शिजवा. नंतर त्यात कोकम आगळ मिक्स करून झाकण ठेवा. अशाप्रकारे आपली रेसिपी रेडी आहे. हेही वाचा >> असंख्य आजारावर रामबाण उपाय असलेल्या पावटयाच्या शेंगाची भाजी कशी करतात? ‘ही’ घ्या सोपी रेसिपी ५. बाऊलमध्ये सोडे बटाटा मसाला वरून थोड़ी कोथिंबिर पेरून डिश सर्व्ह करा. सोबत पोळ्या किंवा भाकरी देता येईल.