उन्हाळा सुरू झालाय याची जाणीव बाजारात कैऱ्या दिसायला लागल्यावर होते. चैत्र महिना हा तर कैरी खाण्याचा हक्काचा महिना, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. अशातच बाजारात कैऱ्यांची आवाक् सुरू झाली की, घरातही कैरीपासून तयार होणाऱ्या पदार्थांची रेलचेल वाढते.आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. जेवणासोबत कैरी खाण्याची तर एक वेगळीच मजा असते. कैरी फक्त खाण्यासाठीच चांगली लागत नाही तर कैरीचे आरोग्यदायी फायदेसुध्दा आहेत. पिंपल्स, उष्मघात, अपचनाची समस्यां यासाठी कैरी एक उपयोगी ठरते. अशातच आज आम्ही कैरीपासून तयार होणारी एक हटके रेसिपी सांगणार आहोत.

कैरीचं सार साहित्य –

  • अर्धा कप उकडलेल्या कैरीचा गर
  • २ मोठे चमचे बेसन, ३-४ हिरव्या मिरच्या चिरुन घ्या
  • किसलेला गूळ अर्धा कप, चवीला मीठ, कढीपत्ता
  • धणेपूड १ चमचा, तेलाची फोडणी-मोहरी, हिंग
  • पाव चमचा मेथी घालून.

कैरीचं सार कृती –

सर्वात आधी मोहरी, हिंग, मिरच्या घालून तेलाची फोडणी तयार करा. त्यानंतर कैरीच्या गरात पाणी आणि कालवलेलं बेसन घालून रवीने घुसळा. मिश्रण झाल्यानंतर तयार केलेली फोडणी या मिश्रणात घाला. त्यानंतर वरुन गूळ, मीठ, धणेपूड घाला. शेवटी स्मोकी फ्लेवरसाठी कढीपत्त्याच्या डहाळ्याला थोडं तेल लावून गॅसवर धरा, नंतर कैरीच्या सारात घाला आणि वरुन झाकण ठेवा. थोड्यावेळाने झाकण काढून कैरीचं सार एकत्र करा. अशाप्रकारे चटपटीत कैरीचं सार खाण्यासाठी तयार आहे.

हेही वाचा – Satara Special: सातारची चमचमीत गावरान वांगी रेसिपी; नक्की ट्राय करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंबा हे उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय आणि स्वादिष्ट फळांपैकी एक आहे. आंबा असो वा कच्ची कैरी उन्हाळ्यात जेवण त्याच्याशिवाय अपूर्ण वाटते. कैरी मध्ये असलेले पोषक तत्त्व कोणत्याही पिकलेल्या फळांच्या तुलनेत कमी नसतात.