Takatli Palak Bhaji : हिवाळ्यात हिरव्या पाल्याभाज्या आवडीने खाल्ल्या जातात. पालक, मेथीचे पदार्थ आपण आवडीने खातो. विशेषत: पालकची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खायला आवडते. तुम्ही आतापर्यंत तुम्ही पालकची भाजी, पालक पनीर, पालकची भजी, पालकच्या पुऱ्या अनेकदा खाल्या असतील पण तुम्ही कधी ताकातली पालक खाल्ली का? हो ताकातली पालक भाजी. ही भाजी चवीला अप्रतिम वाटते.

पालक ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असून ताकसुद्धा तितकेच आरोग्यदायी आहे. पालक आणि ताकाचे हे मिश्रण भाजीला अधिक चविष्ठ बनवतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना ही हटके रेसिपी आवडेल. ज्या लोकांना पालक खूप आवडत असेल त्यांनी ही रेसिपी एकदा तरी बनवायला पाहिजे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही भाजी कशी बनवायची तर टेन्शन घेऊ नका कारण बनवायला ही भाजी अत्यंत सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला ही सोपी रेसिपी नोट करावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहित्य

  • पालक
  • घट्ट ताक
  • शिजवलेले शेंगदाणे
  • बेसन
  • तूप
  • मोहरी
  • जिरे
  • हळद
  • कढीपत्ता
  • बारीक चिरलेली हिरव्या मिरची
  • आलेपेस्ट
  • मीठ

हेही वाचा : Poha Chat : चटपटीत भेळ-पोहे कसे बनवतात? जाणून घ्या ही सोपी रेसिपी

कृती

  • सुरुवातीला पालक स्वच्छ धुवून घ्यावा.
  • त्यानंतर पालक बारीक चिरून घ्यावी
  • एका भांड्यामध्ये ताक घ्यावे त्यात बेसन घालून एकत्र करावे
  • गॅसवर कढई ठेवावी आणि त्यात फोडणीसाठी तूप घ्यावे.
  • तूप गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी.
  • मोहरी तडतडली की त्यात जिरे घालावे.
  • त्यानंतर हळद घालावी.त्यात मिरची आणि आले घालावे आणि सर्व नीट परतल्यावर कढीपत्ता घालावा.
  • शेंगदाणे ३-४ तास भिजवून कुकरमध्ये शिजवावे.
  • शिजवलेले शेंगदाणे फोडणीमध्ये घालून परतावे.
  • शेंगदाणे परतल्यावर लगेच त्यात बारीक चिरलेला पालक घालावा.
  • गॅस मध्यम ठेवून पालक नीट शिजवून घ्यावी
  • पालक शिजल्यावर त्यात घट्ट ताक घालावे आणि नंतर उकळी येईस्तोवर ढवळत राहावे.
  • शेवटी चवीपुरते मीठ घालावे.
  • शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी
  • आणि गरमा गरम ताकातली पालक सर्व्ह करावी.
  • ही ताकातली पालक भाजी तुम्ही सकाळच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकता.