प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार पोह्याचा, मक्याचा तर कोणी कुरकुऱ्याचा हलका फुलका चिवडा बनवणं पसंत करतात. मुरमुऱ्याचा चिवडा नरम पडतो तर कधी मसाला व्यवस्थित एकजीव होत नाही. आज आपण पाहुयात विदर्भ स्पेशल कच्च्या चिवड्याची रेसिपी. विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात.आतापर्यंत आपण वैदर्भीय अनेक रेसिपी पाहिल्या आहेत, चला आज एक हलकी-फुलकी रेसिपी पाहू…

विदर्भ स्पेशल कच्चा चिवडा साहित्य

  • १.५ कप मुरमुरे
  • १/२ वाटी पातळ पोहे
  • २ टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे
  • २ टेबलस्पून दाळव
  • २ मोठे कांदे
  • भरपूर कोथिंबीर
  • १.५ टीस्पून लाल तिखट
  • १ टीस्पून धने पूड
  • १ टीस्पून जीरे पूड
  • चवीनुसार मीठ
  • १/2 टीस्पून हळद
  • १/४ टीस्पून आले पेस्ट
  • १/४ टीस्पून लसूण पेस्ट
  • २-३ टेबलस्पून तेल
  • चतकोर लिंबाची फोड

विदर्भ स्पेशल कच्चा चिवडा कृती

१. प्रथम कांदे बारीक चिरून घ्यावे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. एका बाऊलमध्ये मुरमुरे घेऊन, त्यामध्ये पातळ पोहे मिक्स करावे.

२. नंतर त्यामध्ये दाळव आणि शेंगदाणे मिक्स करावे. लाल तिखट, मीठ, धने- जीरे पूड, आले- लसून पेस्ट, हळद घालून चांगले मिक्स करावे.

हेही वाचा >> हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत व्हेज तवा फ्राय भाजी; घरच्या घरी नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३. नंतर त्यामध्ये तेल घालून चांगले मिक्स करावे. बारीक चिरलेला कांदा घालावा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. चांगले हलवून घ्यावे. लिंबाचा रस घालावा. चांगले मिक्स करून लगेच सर्व्ह करावे. नाहीतर चिवडा मऊ पडतो. तयार आहे कच्चा चिवडा.