प्रशांत कोठडिया

समाज परिवर्तनाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची आणखीन एक कौतुकास्पद ओळख म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ’ असलेला प्रदेश. महाराष्ट्रातील आनंदवन, बाएफ, अफार्म, वॉटर, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, परिसर, आकांक्षा फाऊंडेशन, मानवलोक, सोशल सेंटर, ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान, युसुफ मेहेरअली सेंटर, बारामती कृषी विकास प्रतिष्ठान, मेंढालेखा ग्रामपंचायय, पुणे अंध शाळा, ग्रामायण, ज्ञानप्रबोधिनी, साथी व सेहत, भारतीय जैन संघटना, लोकपंचायत, आदी असंख्य स्वयंसेवी संस्थांनी पायाभूत कार्य केले आहे. शासकीय धोरणांमध्ये आवश्यक तो बदल घडविण्यात आणि शासकीय योजनांना अधिकाधिक लोकाभिमुख व लोकोपयोगी करण्यात स्वयंसेवीक्षेत्राची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. मात्र या संस्थांचे रचनात्मक कार्य लोकांपर्यंत पोहोचत नाही, हे सध्याच्या माध्यमकल्लोळाच्या काळातील वास्तव आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

या पार्श्वभूमीवर निराळा ठरणारा ‘देणे समाजाचे’ हा उपक्रम, राज्यात सर्वदूर पसरलेल्या संस्थांचे कार्य प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून ही उणीव काही प्रमाणात भरून काढत आहे, हे मात्र निश्चित. “देणे समाजाचे’ या उपक्रमाचा प्रारंभ २००५ साली पुण्यामध्ये कशा प्रकारे सुरू झाला हे जाणून घेणे उद्बोधक ठरेल.

हेही वाचा : ज्ञानपीठ आणि कापूसकोंड्या

दिलीप व वीणा गोखले या दांपत्याला जुळ्या मुली होत्या. त्यापैकी एकीला मेंदूचा गंभीर आजार असल्याचे लक्षात आले. त्यावर उपाययोजना करण्याकरिता त्यांनी मान्यवर डॉक्टरांचे सल्ले घेतले व औषधोपचारही केला. त्याच बरोबर, त्यांनी या संदर्भात काम करणाऱ्या काही संस्थांनाही भेटी दिल्या, तेव्हां त्यांच्या लक्षात आले की या संस्था खूपच चांगले कार्य करीत आहेत. या सामाजिक संस्थांचे काम आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, या उदात्त विचारातून श्री. दिलीप गोखले यांनी ‘आर्टिस्ट्री’ या व्यासपीठाच्या वतीने आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांचे कार्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे ठरवले आणि त्यातून २००५ साली पुणे शहरात ‘देणे समाजाचे’ या उपक्रमाचा जन्म झाला. त्याकरिता काही मित्रमंडळींनी थोडेफार आर्थिक सहकार्य केले असले तरी, गोखले दांपत्यानेच त्याचा मोठा भार उचलला. त्यासाठी त्यांनी पितृपक्षाचा पंधरावड्यातील तीन दिवस निवडले. पूर्वजांच्या स्मरणार्थ या काळात परंपरेनुसार दानधर्म करण्यासाठी असंख्य लोक प्रेरित झालेले असतात. त्यादृष्टीने राज्यभरातील २५ ते ३२० संस्थांची निवड करण्यात आली.

पहिल्याच वर्षी म्हणजेच २००५ साली ‘देणं समाजाचं” या प्रदर्शनास लोकांचा चांगला प्रतिसाद लाभल्यामुळे गोखले दांपत्याचा हुरूप वाढला. आता दरवर्षी हा उपक्रम आयोजित करायचा असेही या दोघांनी मनोमन ठरवले. मात्र २००८ साली, प्रदर्शनाच्या काही दिवस अगोदरच दिलीप गोखले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मात्र अशाही अत्यंत कसोटीच्या वेळी वीणा गोखले या धीरोदत्तपणे उभ्या राहिल्या आणि ठरल्यानुसार हे प्रदर्शन यशस्वी केले.

हेही वाचा : ‘एडीआर’सारखे गट हवेच, ते का?

संस्था निवडीची प्रक्रिया दरवर्षी काटेकोरपणे पार पाडली जाते. प्रदर्शनाच्या आधी तीन महिने वीणा गोखले या संस्थांना प्रत्यक्ष भेटी देतात आणि त्यांचे कार्य डोळसपणे समजावून घेतात. संस्थांच्या कार्यातील सचोटीची खात्री पटल्यावरच संस्थांची अंतिम निवड केली जाते. निवड झालेल्या संस्थांना प्रत्येकी दोन वर्षांकरिता विनामोबदला स्टॉल्स मांडण्याची संधी दिली जाते आणि त्यांच्या राहण्या-जेवणाचीही सोय या उपक्रमाच्या वतीने केली जाते. या स्टॉल्समधून संस्था ‘ना नफा -ना तोटा’ या तत्त्वानुसार ग्रामीण, आदिवासी वा शहरी भागात उत्पादित केलेल्या आणि वंचित लोकांना रोजगार मिळवून देणा-या वस्तू मांडतात. स्टॉलवर भेटीला आलेल्या लोकांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली जाते. आजवर २६५ हून अधिक संस्था ‘देणे समाजाचे’ उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. आजवर देणग्या आणि वस्तूंच्या विक्रीच्या स्वरूपात सुमारे १२ते १३ कोटींची रक्कम आणि मदत कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट संस्थांपर्यंत पोहोचली आहे. त्याच बरोबर, संस्थांना भेडसावणाऱ्या अनेकविध समस्यांबाबत अनेक तज्ज्ञांचे व सल्लागारांचे मार्गदर्शन उपलब्ध होते, ही आणखी एक जमेची बाजू म्हणता येईल.

हेही वाचा : निवडणूक रोख्यांची लबाडी..

या सामाजिक दानोत्सवाच्या यशस्वितेसाठी असंख्य जणांची मदत होत असते. निरलस भावनेने कार्य करणा-या सर्व वयोगटातील कार्यकर्त्यांचा मोठा संच अहोरात्र झटत असतो. मागील १९ वर्षात ‘देणे समाजाचे’ उपक्रमाने पुण्यामध्ये चांगलेच बाळसे धरले असून, मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पंचिवसावा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. चार वर्षांपूर्वीपासून हा उपक्रम मुंबई येथे आयोजित करण्यात येत असून, ठाणे शहराच्या परिसरातही दोन वर्षांपासून या प्रदर्शन मांडण्यात येते. खास ठाणे परिसरासाठी २४व २५ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘देणे समाजाचे’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंसेवी क्षेत्राला पाठबळ देणारे हे प्रदर्शन, महाराष्ट्र सेवा संघ, जवाहरलाल नेहुरू मार्ग, ‘अपना बाजार’च्या वर, मुलुंड येथे सकाळी १० ते रात्रौ ९ पर्यंत लोकांसाठी विनामूल्य खुले आहे.ठाणेकर व मुलुंडकर या प्रदर्शनास भेट देऊन, अशा समाजपयोगी ‘चळवळी’त आपले योगदान देतीलच, पण ज्यांना इथे येणे शक्य होणार नाही त्यांच्यापर्यंतही अशा उपक्रमाची माहिती पोहोचावी एवढाच या लिखाणाचा हेतू!

((समाप्त))