म. गांधी यांच्याविषयी आजवर अनेक लेखकांनी अनेक अंगांनी लिहिलेले आहे. पण गांधीजींच्या बरोबर स्वातंत्र्य चळवळीतल्या असलेल्या गांधीवादी स्त्रियांविषयी मात्र फारशी पुस्तके नाहीत. ‘मीरा आणि महात्मा’ हे एक पुस्तक असले तरी त्यात गांधीवादी महिला कार्यकर्त्यांविषयी फारसे काही नाही.
महाराष्ट्रात गांधीवादी महिलांपैकी एक ठळक नाव म्हणजे प्रेमा कंटक. ‘सत्याग्रही महाराष्ट्र’ हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक त्यांच्यावरील गांधीप्रभावाची साक्ष देते. येत्या गांधी जयंतीच्या (२ ऑक्टोबर) निमित्ताने प्रा. मीरा कोसंबी यांनी संपादित केलेले ‘महात्मा गांधी अँड प्रेमा कंटक- एक्सप्लोरिंग अ रिलेशनशिप, एक्सप्लोरिंग हिस्ट्री’ हे महत्त्वाचे पुस्तक ऑक्सफर्ड प्रकाशित करते आहे.
यात प्रेमा कंटक आणि गांधीजींचा पत्रव्यवहार, त्यांच्या ललित-ललितेतर साहित्यातील भाग, गांधी तत्त्वज्ञानाची गुंतागुंत आणि गांधीचे स्वातंत्र्यलढय़ातील स्त्रियांच्या भूमिकेविषयीचे मत, यांचा सविस्तर ऊहापोह केला आहे.
या पुस्तकातून प्रेमा कंटक-म. गांधी यांच्याबरोबरच गांधींच्या अनुयायी असलेल्या महिलांसोबतचाही अनुबंध उलगडतो. प्रेमाताई कडव्या गांधीवादी म्हणून परिचित होत्या, पण अशा अनेक कडव्या गांधीवादी महिलांचा इतिहास या पुस्तकातून मांडला आहे, जो आजवर काहीसा दुर्लक्षित राहिला होता.

फ्रंट शेल्फ
सौजन्य -फ्लिपकार्ट.कॉम
टॉप  ५ फिक्शन
रशियन रूले : अँथनी होरोवित्झ, पाने : ४१६३५० रुपये.
द किल लिस्ट : फ्रेड्रिक फॉर्सिथ, पाने : ३५२३९९ रुपये.
मॉम इन द सिटी : कौशल्या सप्तऋषी, पाने : ३४४२५० रुपये.
द टिडेस ऑफ मेमरी : सिडनी शेल्डन, पाने : ४००२९९ रुपये.
द बिग फिक्स : विकास सिंग, पाने : २३६२५० रुपये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
१० जजमेंट्स दॅट चेंज्ड इंडिया : झिया मोदी, पाने : २५६/३९९ रुपये.
झिलॉट- द लाइफ अँड टाइम्स ऑफ जेसुस ऑफ नाझरेथ : रेझा अस्लन, पाने : ३३६/४९९ रुपये.
माय जर्नी- ट्रान्सफॉर्मिग ड्रीम्स इन्टु अ‍ॅक्शन्स : ए.पी.जे. अब्दुल कलाम, पाने : १६०१९५ रुपये.
व्हाय नेशन्स फेल : डॅरॉन अ‍ॅसोमोग्लू- जेम्स ए. रॉबिन्सन, पाने : ४६४/५९९ रुपये.
सेव्हॉर मुंबई- अ क्युलिनरी जर्नी थ्रु इंडियाज् मेल्टिंग पॉट : विकास खन्ना, पाने : ३३२८९५ रुपये.