भूकवचातील पदार्थ : खडक
(वळ्यांचे प्रकार- उर्वरित भाग)
= असमान वळ्या (Asymmetrical Folds) : भूकवचावर जेव्हा दोन्ही बाजूंकडील दाब असमान म्हणजेच कमी-अधिक असेल अशा वेळी भूकवचास वळी पडून एका बाजूस तीव्र उतार व एक बाजू सौम्य उताराची असते.
अशा प्रकारच्या वळीस ‘असमान वळ्या’
असे म्हणतात.
= समतन वळ्या ((Isoclinal Folds) : जेव्हा दोन्ही बाजूंकडील दाब कमी तीव्रतेचा असेल अशा वेळी भूकवचास वळी पडून एक बाजू जास्त दाबली जाते. थोडक्यात अपनती ही अवनतीवर डोकावते आणि वळीच्या बाजू एकाच दिशेने झुकलेल्या असतात. अशा प्रकारच्या वळीस ‘समनत वळ्या’ असे म्हणतात.
= परिवलन वळी (Recumbet Folds) : या वलीकरण प्रक्रियेत वळीच्या दोन्ही बाजू एकाच दिशेने झुकलेल्या असतात. त्या परस्परांना समांतर असतातच, पण त्याच वेळी त्या भूकवचालाही समांतर असतात. अशा वळ्यांना
‘परिवलन वळ्या’ असे म्हणतात.
= पंखसदृश वळ्या (Fan Folds) : भूकवचावर जेव्हा दोन्ही बाजूंकडील दाब समान, सारखाच असतो आणि तीव्र दाबामुळे भूकवचास अनेक लहान वळ्या पडून हा दाब ज्या भागात केंद्रित होतो, त्या भागातील वळी इतर वळींपेक्षा जास्त वर आलेली असते. अशा रीतीने भूकवचाला वळ्या पडून भूकवचास पंख्याचा आकार प्राप्त होतो, म्हणून या वळ्यांना ‘पंखसदृश वळ्या’ असे म्हणतात.
= ग्रीवा खंड (Nappes) : या वलीकरण प्रक्रियेत वळीच्या दोन्ही बाजूंनी येणारा दाब अतिप्रचंड असतो. त्यामुळे वळीच्या आसावर इतका ताण पडतो की, आसाजवळील वळीचा भाग दुभंगतो व त्यामुळे काही वेळेस दुभंगलेल्या भागाला अनुसरून जास्त दाबाकडील वळीची भुजा दुसऱ्या भुजेवर सरकते. अशा विखंडीत वळीला ‘ग्रीवाखंड’ असे म्हणतात. सागर किनाऱ्यावर आणि क्षितिजसमांतर थर असणाऱ्या स्तरीय खडकात ग्रीवाखंड प्रक्रिया मोठय़ा प्रमाणात घडण्याची शक्यता जास्त असते.
ऊध्र्वगामी किंवा उभ्या हालचाली (Vartical Movement) : भूपृष्ठातील अग्निजन्य किंवा कठीण खडकावर दाब किंवा ताण पडून खडकाला भेगा किंवा तडे जातात, त्यास ‘प्रस्तरभंग’ असे म्हणतात. भूपृष्ठातील किंवा भूकवचावरील खडकांना मोठमोठय़ा भेगा पडतात किंवा त्यात जोड निर्माण होतात. खडकांना भेग पडून त्या भेगेजवळील खडकांच्या तुकडय़ांमध्ये स्थानांतर झाल्यास त्या भेगेला ‘भ्रंश’ असे म्हणतात. ताण किंवा दाब यामुळे भूपृष्ठ दुभंगून प्रस्तरभंग निर्माण होतो.
प्रस्तरभंगाचे प्रकार (Types of Fault) :

= साधा किंवा प्रसामान्य प्रस्तरभंग (Normal Fault) : खडकावर ताण येऊन निर्माण होणाऱ्या भेगेजवळील खडकाच्या तुकडय़ात क्षितिजसमांतर दिशेने हालचाल होते व ते परस्परांपासून विरुद्ध दिशेने सरकतात. अशा वेळी खडकावर ताण येऊन प्रस्तरभंग होतो. भूपृष्ठ ज्या ठिकाणी भंग पावला असेल त्या पृष्ठभागावरून भूस्तराचा वेगळा झालेला तुकडा उताराच्या दिशेने खाली सरकतो.
यालाच साधा किंवा प्रसामान्य प्रस्तरभंग
असे म्हणतात.
= व्युत्क्रम प्रस्तरभंग (Reverse Fault) : खडकावर दाब येऊन निर्माण होणाऱ्या भेगेच्या पृष्ठभागाच्या उताराच्या विरुद्ध दिशेने दाबामुळे प्रस्तर वर सरकतात, त्यालाच ‘व्युत्क्रम प्रस्तरभंग’ असे म्हणतात.
लेखन : डॉ. जी. आर. पाटील

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Using Plastic Chopping Board Can Harm Stomach Throw These Four Items From Kitchen
Earth Day: तुमच्या किचनमधून आजच बाहेर काढा ‘या’ ४ वस्तू; पर्यावरणच नव्हे तर पोटाच्याही ठरतात शत्रू
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू