Apple CEO Tim Cook Salary: भारतातील पहिले अ‍ॅपल (Apple) स्टोअर  १८ एप्रिल २०२३ रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू झाले. अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांच्या हस्ते या स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. टीम कुकने स्टोअरचे दरवाजे उघडून औपचारिक उद्घाटन केले.  टिम कूक यांनी अक्षरशः भारतीयांना ॲपलचे वेड लावले आहे.  सध्या टीम कूक हा देशातील सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का टीम कूक लोकांमध्ये इतके लोकप्रिय का आहेत? आणि त्यांचा पगार, संपत्ती जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल, चला तर जाणून घेऊया…

टिम कूक Apple चे CEO कधी झाले?

१९९८ मध्ये, टिम कूक Apple मध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून रुजू झाले. ते कंपनीचे तत्कालीन सीईओ स्टीव्ह जॉब्स यांच्या हाताखाली काम करायचे. स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर टीम कूक २०११ मध्ये अॅपलचे सीईओ बनले. अमेरिकेतील अलाबामा येथे जन्मलेल्या कूकचे वडील शिपयार्ड कामगार होते आणि आई फार्मसीमध्ये काम करत होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुकने १२ वर्षे IBM मध्ये काम केले. त्यांनी सांगितले की एकदा स्टीव्ह जॉब्सने विचारले तेव्हा ते अॅपलमध्ये सामील झाले आणि अ‍ॅपलला जगातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक बनविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

(हे ही वाचा : भारतातील Apple Store मधील कर्मचाऱ्यांना ‘इतका’ पगार मिळणार, जाणून थक्क व्हाल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टिम कुकची एका दिवसाची कमाई किती?

२०२२ मध्ये Apple चे CEO म्हणून टिम कुकचे वार्षिक पॅकेज $९९.४ दशलक्ष म्हणजेच ८१५ कोटी रुपये होते. त्यानुसार त्यांची एका दिवसाची कमाई २.२३ कोटी रुपये होती. पण २०२३ मध्ये, टीम कुकने स्वतःचे वार्षिक पॅकेज $ ४९ दशलक्ष किंवा सुमारे ४०२ कोटी रुपये कमी केले. त्यानुसार आता त्याची एका दिवसाची कमाई १.१० कोटी रुपये आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अ‍ॅपलने अमेरिकेतील कायदेशीर फाइलिंगमध्ये टिम कुकच्या पॅकेजबद्दल ही माहिती दिली आहे.