सध्या अनेक टेलिकॉम कंपन्या आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन प्लॅन्स आणत आहेत. बीएसएनएल, एअरटेल, जिओ , वोडाफोन-आयडिया या त्या कंपन्या आहेत. या टेलिकॉम कंपन्यांनी सातत्याने काही कालावधीपासून त्यांच्या प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. मात्र सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) कसे अनेक स्वस्त किंमतीचे प्लॅन्स उपलब्ध आहेत. बीएसएनएलचा एक खास प्लॅन आहे ज्याची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी आहे पण त्यात फायदे अधिक आहेत. हा प्लॅन नक्की आहे तरी काय हे आपण जाणून घेऊयात.
बीएसएनएलकडे वापकर्त्यांसाठी १०० रुपयांपेक्षा स्वस्त प्लॅन आहे. ९९ रुपयांत हा प्लॅन वापरकर्ते खरेदी करू शकणार आहेत. BSNL च्या या ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला १८ दिवसांची वैधता मिळते. STV_99 या नावाने कंपनीने हा प्लॅन सुरु केला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळते. यामध्ये वापरकर्ते कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स करू शकणार आहेत. यामध्ये दिल्ली आणि मुंबई या सर्कलचा समावेश आहे. BSNL च्या या व्हॉईस व्हाउचरमध्ये कोणताही डेटा देण्यात येत नहीं.
हेही वाचा : Jio Recharge Plan: जिओने आणला तीन महिन्यांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या
तसेच बीएसएनएलचे ३५ रूपये, ३६ रूपये , ४८ रुपये व ८७ आणि ९७ रुपये त्यासोबतच ११८ रुपये, १८४ रुपये, १८५, १८६, १८७ आणि २४७ रुपये व ३१९ रुपये असे प्रीपेड प्लॅन आहेत. STV_347 हे बीएसएनलचे सर्वात महागडे व्हॉइस व्हाउचर आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स या सुविधा वापरकर्त्यांना