५ ऑक्टोबरपासून आयसीसी पुरुष वर्ल्ड कप २०२३ (ICC Men’s Cricket World Cup 2023 ) ही स्पर्धा सुरु होणार आहे. यासाठी सर्व संघांचे सर्व सामने सुरु झाले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्याआधीच डिस्नी+ हॉटस्टारने आपले अँड्रॉइड आणि आयओएस App अपडेट केले आहे. डिस्नी + हॉटस्टारने आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘MaxView’ व्हर्टिकल व्हिडीओ स्ट्रीमिंग लॉन्च केले आहे. आपल्या वापरकर्त्यांसाठी ‘MaxView’ व्हर्टिकल व्हिडीओ स्ट्रीमिंग लॉन्च करणारे डिस्नी+ हॉटस्टार हे पहिले प्लॅटफॉर्म ठरले आहे. डिस्नी + हॉटस्टारने आयसीसीबरोबर पार्टनरशिप करून व्हिडीओ स्ट्रीमिंग फिचर डेव्हलप केले आहे.

‘MaxView’ या व्हिडीओ स्टीमिंग फीचरच्या मदतीने वापरकर्ते आता व्हर्टिकल मोडमध्ये वर्ल्ड कपचे सामने बघू शकणार आहेत. या फीचरच्या मदतीने एका हाताने मोबाइलमध्ये सामने पाहण्याचा अनुभव पहिल्यापेक्षा अधिक चांगला होणार आहे. MaxView हे डिस्नी + हॉटस्टारवरील असे एक फिचर आहे. ज्यामध्ये वापरकर्ते आपल्या गरजेनुसार ऑप्ट इन करू शकणार आहेत. याशिवाय वापरकर्त्यांना लाइव्ह फीड टॅब, स्कोअरकार्ड आणि व्हर्टिकल Ads फिचर देखील यात मिळणार आहे. वापरकर्त्याने या फीचरशिवाय सिंगल प्लेअर फ्रेम हे अतिरिक्त फिचर देखील मिळणार आहे. वापरकर्ते आपल्या आवडत्या खेळाडूला जवळून पाहू शकणार आहेत.डिस्नी + हॉटस्टारचे हे नवीन फिचर अँड्रॉइड आणि iOS या दोन्हीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

Champions League T20 to resume
Champions League T20 : १० वर्षांनंतर चॅम्पियन्स टी-२० लीग खेळवली जाणार? भारतासह ‘या’ तीन देशांनी दाखवले स्वारस्य
IPL 2024 Performance of 5 impact players
IPL 2024 : शिवम दुबे ते साई सुदर्शनपर्यंत ‘या’ ५ ‘इम्पॅक्ट प्लेयर्स’नी पहिल्या १० दिवसात गाजवलं मैदान
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद
India Vs Australia Test Series 2024 Schedule Announced
IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ मैदानांवर खेळले जाणार पाच सामने

हेही वाचा : Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन हवे आहे? रिलायन्स जिओचे ‘हे’ प्लॅन्स एकदा पाहाच

याशिवाय अपडेटेड डिस्नी + हॉटस्टार प्लॅटफॉर्म अशा प्रकारे ऑप्टिमाइझ करण्यात आले आहे की तुम्ही हाय क्वालिटीमध्ये सामने बघत असून देखील तुमच्या डेटा कमी प्रमाणात खर्च होईल. म्हणजेच वापरकर्ते आपला मोबाइल डेटा वाचवू शकतात. तसेच स्ट्रीमिंग क्वालिटी अधिक सुधारण्यासाठी प्लॅटफॉर्म AI मदत देखील घेत आहे. क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मने एक ऑन स्कोअरबोर्ड देखील सादर केला आहे. ज्यामुळे वापरकर्ते नेहमी एका क्लिकवर स्कोअर पाहू शकणार आहेत. मात्र ज्यांच्याकडे सबस्क्रिप्शन नसेल त्यांना हे सामने ४८० पिक्सेल क्वालिटीमध्ये दिसतील व ज्यांच्याकडे सबस्क्रिप्शन आहे त्यांना १०८० पिक्क्सएल क्वालिटीमध्ये वर्ल्ड कपचे सामने बघता येणार आहेत.

या व्हर्टिकल स्ट्रीमिंग फीचरसह डिस्नी + हॉटस्टारने आपले ‘Coming Soon Tray’ हे नवीन कंटेंट डिस्कव्हरी फिचर लॉन्च केले आहे. या फिचरच्या मदतीने वापरकर्त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या शो आणि चित्रपटांविषयी माहिती मिळणार आहे. डिस्नी + हॉटस्टारमध्ये मोफत प्रवेश देखील मिळवता येतो. याशिवाय वापरकर्त्यांना दोन वेगवेगळे सबस्क्रिप्शन प्लॅन देखील मिळतात. डिस्नी+ हॉटस्टारच्या सुपर प्लॅनची किंमत ८९९ रुपये आहे.याची वैधता १ वर्ष इतकी आहे. तर प्रिमियम प्लॅन हा १,४९९ रुपयांचा असून त्याची वैधता पण १ वर्ष इतकी आहे. प्रीमियम प्लॅनमध्ये ४के रिझोल्युशन स्ट्रीमिंगसह कोणत्याही जाहिरातींशिवाय कंटेंट पाहता येतो.