आजच्या युगात स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरत नाही असा क्वचितच कोणी असेल. परंतु अनेकदा असे घडते की आपल्या फोनचे इंटरनेट खूप स्लो चालते त्यामुळे अनेक कामांमध्ये व्यत्यय येतो. आज आपण अशाच एका ट्रिकबद्दल जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोनचा डेटा स्पीड सुपर फास्ट करू शकता.

आपल्या फोनचा इंटरनेट स्पीड कमी होतो कारण आपले डिव्हाइस स्लो नेटवर्क बँडविड्थ पकडू लागते. वास्तविक, नेटवर्क प्रदाते वेगवेगळ्या बँडविड्थचे नेटवर्क जोडतात, ज्यात 3G, 4G आणि LTE समाविष्ट असतात. काहीवेळा आपला फोन स्लो बँडविड्थवर आपोआप स्विच होतो जेणेकरून आपण नेहमी इंटरनेटशी कनेक्ट असू. अनेक वेळा असे दिसून आले आहे की रेंजमध्ये परत आल्यानंतरही फोन आपोआप वेगवान बँडविड्थसह नेटवर्कवर स्विच होत नाही. तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन हे बदलू शकता.

सोशल मीडिया स्टार किली पॉलवर अज्ञातांनी चाकूने केला हल्ला; इंस्टाग्रामवरून दिली घटनेची माहिती

सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जा आणि ‘नेटवर्क ऑपरेटर’चा पर्याय निवडा. येथे तुम्हाला ‘Choose Automatically’ नावाचा पर्याय दिसेल, तो बंद करा. तुम्ही तो पर्याय बंद करताच तुमच्यासमोर नेटवर्क प्रोव्हायडरची यादी येईल, ज्यामधून तुम्हाला तुमच्या टेलिकॉम कंपनीचा पर्याय निवडावा लागेल. तुमची कंपनी निवडल्यानंतर फोनची सेटिंग्ज बंद करा आणि तुमचा फोन एकदा रीस्टार्ट करा. अशा प्रकारे तुम्ही फोनचा वेग वाढवू शकाल.

सहसा तुम्ही ही युक्ती प्रत्येक परिस्थितीत वापरू शकता, परंतु कधीकधी तुम्ही अशा भागात असाल जिथे कंपनीचे जास्त टॉवर नाहीत. अशा ठिकाणी ही युक्ती काम करणार नाही कारण नेटवर्क प्रदात्याला चांगला डेटा स्पीड देण्यात अडचणी येऊ शकतात.