scorecardresearch

Premium

Easyfone Marvel+ Review: खास आजी-आजोबांसाठी बनवलाय हा फोन, आपत्कालीन SOS बटणाचं खास फीचर

जर तुम्हाला असा फोन हवा असेल जो तुम्हाला तुमच्या मित्र आणि कुटुंबाशी कनेक्टेड ठेवेल किंवा तुमच्या आजी-आजोबांना ऑपरेट करणं सोपा असेल असा फोन द्यायचा असेल, तर Easyfone Marvel+ हा एक उत्तम पर्याय आहे.

easyfone-marvel-main

मोबाईल फोनने गेल्या काही वर्षांत सर्वात मोठी क्रांती केली आहे. कीपॅड आणि VGA कॅमेरासह काळ्या-पांढऱ्या स्क्रीनसह येत असलेले, डिव्हाईस आता २०० MP कॅमेरा, १२० W फास्ट चार्जिंग आणि AMOLED-पोल डिस्प्ले यासारख्या शक्तिशाली फीचर्ससह मिळत आहे. तंत्रज्ञानात खूप प्रगती झाली आहे, पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण आपल्या बऱ्याच कामांसाठी या स्मार्टफोन्सवर अवलंबून झालो आहोत. परंतु अनेक वेळा असे घडते की, आपल्याला मानसिक शांती हवी असते आणि त्यासाठी स्मार्टफोनपासून दूर राहणं आवश्यक बनतं. याशिवाय स्मार्टफोन ऑपरेट करू इच्छिणाऱ्या आजी-आजोबांसाठी फीचर फोन हा एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला असा फोन हवा असेल जो तुम्हाला तुमच्या मित्र आणि कुटुंबाशी कनेक्टेड ठेवेल किंवा तुमच्या आजी-आजोबांना ऑपरेट करणं सोपा असेल असा फोन द्यायचा असेल, तर Easyfone Marvel+ हा एक उत्तम पर्याय आहे.

SeniorWorld नावाची ही कंपनी खास करून आजी-आजोबांसाठी हा फोन बनवत आहे. Easyfone Marvel+ मध्ये काय खास आहे ते जाणून घेऊया.

Who is Satish Malhotra
खऱ्या आयुष्यातील ‘बॉस’! कर्मचार्‍यांचा पगार वाढवण्यासाठी चक्क स्वतःचा पगार केला कमी, कोण आहेत सतीश मल्होत्रा?
heart attack right chest pain Know the signs and symptoms Warning Signs of a Heart Attack
तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? मग असू शकते ‘हे’ हार्ट अटॅकचे लक्षण? वेळीच व्हा सावध अन् लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला
Kitchen Jugaad
Kitchen Jugaad : कांद्याची साल कचरा समजून चुकूनही फेकू नका, असा उपयोग करा अन् मिळवा अफलातून फायदे
Hyundai Car offers discounts
सणासुदीत ग्राहकांना दिलासा! Hyundaiच्या ‘या’ कार्सवर बंपर सूट, पाहा खरेदीवर किती होईल तुमच्या पैशांची बचत

आणखी वाचा : सॅमसंगची जबरदस्त ऑफर! महागड्या स्मार्टफोनसाठी लॉंच केली Buy now Pay later सेवा

Easyfone Marvel+: काय खास आहे?
या स्मार्टफोनमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी अतिरिक्त SOS बटण आहे जे फोनच्या मागील पॅनलवर आहे. याशिवाय निवडलेल्या नंबरवर युजरला संपर्क करणे सोपे करण्यासाठी फोनमध्ये व्हाइटलिस्ट फीचर देण्यात आले आहे.

Easyfone Marvel+ क्रॅडल चार्जरसह मिळतो, ज्याद्वारे फोन चार्ज करणे सोयीचे होईल. क्रॅडल चार्जरमध्ये मायक्रो-USB पोर्ट आहे, ज्याद्वारे केबल जोडली जाऊ शकते आणि प्लग इन करता येईल. हा फीचर फोन इंग्रजीशिवाय हिंदी, मल्याळम, तेलगू, बंगाली, तमिळ, कन्नड अशा अनेक प्रादेशिक भाषांना सपोर्ट करतो.

EasyFone Marvel Plus चे आणखी एक फीचर म्हणजे मोठी बटणे आणि फॉन्ट, ज्यामुळे वृद्धांना फोन वापरणे अतिशय सोयीचे होते.

आणखी वाचा : विराट कोहलीच्या हातात दिसला Vivo V25 Pro, १८ ऑगस्ट रोजी भारतात लॉंच होऊ शकतो

Easyfone Marvel+ Design, Specifications
Easyfone Marvel+ च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा बॅक पॅनल काढता येण्याजोगा आहे. बॅटरी देखील काढली जाऊ शकते. लूकबद्दल बोलायचे झाले तर तो नोकिया फीचर फोनसारखा दिसतो. पहिल्या नजरेत फोन पाहिल्यावर तुम्हाला नोकियाचा फीचर फोन आठवेल. कारण हा फोन ना टच स्क्रीन आहे ना Android OS सह येतो. या फोनमध्ये IPS स्क्रीन आहे जी मोठी आहे. म्हणजेच, मोठ्या स्क्रीनवर फॉन्ट देखील स्वच्छ आणि मोठे दिसू लागल्याने आजी-आजोबांना हा फोन वापरणे सोपे होईल.

या फीचर फोनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी एक मोठा न्यूमेरिक कीपॅड आहे, ज्यावर कॅपिटल अक्षरे स्पष्टपणे दिसतात. या फोनच्या तळाशी तुम्हाला चार्जिंग पोर्ट आणि ३.५ mm ऑडिओ जॅक मिळेल. मागील पॅनेलबद्दल बोलायचं झालं तर आपण ते सहजपणे काढू शकतो. मागील पॅनेलखाली तुम्हाला बॅटरी मिळेल. बॅटरी काढून टाकल्यानंतर दोन सिम पोर्ट आणि एक मायक्रोएसडी कार्ड पोर्ट दिसून येईल. फोनमध्ये दिलेल्या दोन्ही सिम कार्ड स्लॉटमध्ये जुन्या आकाराचे सिमकार्ड वापरले आहे.

फोनच्या मागील बाजूच्या वरच्या बाजुला तुम्हाला फ्लॅशलाइट मिळेल. मागील पॅनेलच्या वरच्या बाजूला एक SOS बटण आहे, जे तुम्ही ५ प्राथमिक क्रमांकांवर सेट करू शकता. हे बटण दाबल्यावर ५ आपत्कालीन संपर्कांना एसएमएस पाठवण्याव्यतिरिक्त कॉल डायल केले जातात.

आणखी वाचा : वायरलेस चार्जिंगसह फ्लॅगशिप Samsung Galaxy S22 चा नवा अवतार, जाणून घ्या काय आहे खास?

Easyfone Marvel+ Performance
Marvel+ फोनला पॉवर देण्यासाठी, ८०० mAh बॅटरी देण्यात आली आहे. आम्ही फोन वापरला आणि लक्षात आलं की बॅटरी खूप लवकर डिस्चार्ज होते आणि दिवसभर वापरण्यासाठी तुम्हाला तो पुन्हा पुन्हा चार्जिंगवर ठेवावा लागेल. जर कंपनीने फोनमध्ये मोठ्या क्षमतेची बॅटरी दिली असती तर फोन आणि यूजर्ससाठी हा प्लस पॉइंट ठरला असता. फोनमध्ये दिलेला फ्लॅशलाइट अतिशय तेजस्वी आहे आणि अंधारात किंवा आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडेल.

आम्हाला या फोनमध्ये उपस्थित असलेले Photo Dial फीचर आवडले, ज्याद्वारे अॅड्रेस बुक न उघडता ८ फोटो कॉन्टॅक्टना फेवरेट करता येऊ शकतं.

Easyfone Marvel+ युजर्सना औषध, डॉक्टरांच्या भेटी किंवा इतर कोणत्याही सामाजिक कार्यक्रमासाठी रिमाइंडर सेट करण्याची सुविधा देते. याशिवाय नको असलेले नंबर थेट ब्लॉक केले जाऊ शकतात.

आणखी वाचा : घरबसल्या Aadhaar Card वर दोन मिनीटात बदला नाव-पत्ता, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

आम्ही फोनमध्ये एफएम वापरला आणि लक्षात आले की फोनला फ्रीक्वेंसी पकडण्यात काही अडचण येतात. आम्हाला फोन जवळ ठेवावा लागला आणि स्पष्ट रेडिओ ऐकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.

फोनमध्ये दिलेल्या OS सह, तुम्हाला एक म्युझिक प्लेयर, ३२ GB पर्यंत वाढवता येणारे स्टोरेज कार्ड, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि कॅमेरा मिळतो. कॅमेर्‍याकडून काहीही अपेक्षा करू नका, कारण ते अतिशय बेसिक आणि केवळ नावापुरते आहे.

Easyfone Marvel+ : काय खास आहे?
Easyfone Marvel+ हा सेकेंडरी बॅकअप फोन असू शकतो ज्याची किंमत ३,३७५ रुपये आहे. पण आजी-आजोबांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. SOS बटण, रिमाइंडर फीचर आणि विशेष म्हणजे मोठी बटणे आणि फॉन्ट ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Easyfone marvel review 4g phone made for seniors with sos button and removable back pannel battery prp

First published on: 28-07-2022 at 19:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×