scorecardresearch

नोकरी मिळत नाहीये? आता ‘या’ प्लॅटफॉर्मच्या मदतीने झटकन मिळेल जॉब…

नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी आणखीन एक प्लॅटफॉर्म सज्ज झाले आहे

Elon Musk will now make the job search tool feature on the X platform available to all users
(सौजन्य: लोकसत्ता.कॉम) नोकरी मिळत नाहीये? आता 'या' प्लॅटफॉर्मच्या मदतीने झटकन मिळेल जॉब…

सोशल मीडियाच्या काळात नोकरी शोधण्यासाठी अनेक ॲप उपलब्ध आहेत. यातच लिंक्डइन (linkedin) अनेकांची पहिली पसंती ठरते आहे, तर आता नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी आणखीन एक प्लॅटफॉर्म सज्ज झाले आहे, ते म्हणजे एक्स (ट्विटर). टेस्ला, स्पेसएस्कचे सीईओ आणि एक्सचे (ट्विटर) मालक एलॉन मस्क यांनी एक्स (ट्विटर) मध्ये अनेक बदल केले. सुरुवातीला त्यांनी नाव बदलून ट्विटर काढून (एक्स) केले, त्यामुळे अनेक युजर्स त्यांच्या ब्लू बर्डला खूप मिस करत आहेत. तसेच यानंतर रिट्विटच्या जागी रिपोस्ट हा पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिला; असे अनेक बदल एलॉन मस्क यांच्याकडून करण्यात आले.

तर आता टेस्ला आणि स्पेसएस्कचे सीईओ आणि एक्सचे (ट्विटर) मालक एलॉन मस्क एक नवीन फिचर घेऊन येत आहेत. एक्स (ट्विटर) वापरकर्त्यांसाठी लिंक्डइनसारखा एक सर्च टूल घेऊन येणार आहे; ज्याचे नाव आहे ‘जॉब सर्च टूल’ (Job Search Tool). खरंतर हे ऑगस्टमध्येच लाँच करण्यात आले होते, पण ते फक्त ब्ल्यू टिक असणाऱ्या म्हणजेच अधिकृत अकाउंट वापरकर्त्यांसाठीच होते, तर आता एलॉन मस्क ‘जॉब सर्च टूल’ हे सर्व युजर्ससाठी उपलबध करण्याचा विचार करत आहेत.

SBI SCO Recruitment 2023
एसबीआयच्या करोडो ग्राहकांसाठी नवी सुविधा, आता घरबसल्या बँकिंग सेवा मिळणार
whatsapp increase duration status fot 2 weeks
व्हॉट्सअ‍ॅपचं जबरदस्त फिचर; दोन आठवडे लाइव्ह ठेवता येणार Status, जाणून घ्या सविस्तर
coconut wholesale price
आता शहाळी ही मिळणार घाऊक दरात?
HIV
एड्सच्या जनजागृतीसाठी ‘क्यूआर कोड’, मोबाइलवर मिळणार सहज माहिती

हेही वाचा…आता इन्स्टाग्रामवर ‘क्लोज फ्रेंड्स’ लिस्टसह ‘या’ गोष्टीसुद्धा होणार शेअर… पाहा काय होणार बदल

एलॉन मस्क लवकरच जॉब सर्च टूल हा पर्याय अँड्रॉइड (Android) आणि आयफोन (iPhone) युजर्ससाठी उपलब्ध करून देणार आहेत. तसेच हा टूल वापरकर्त्यांसाठी विनामूल्य आहे. जॉब सर्च टूल हा एक्स (ट्विटर) वापरकर्त्यांना नोकरी शोधण्यासाठी आणि नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हे मायक्रोसॉफ्टच्या मालकीचे प्लॅटफॉर्म लिंक्डइन (LinkedIn) ॲपसारखे असणार आहे. त्यामुळे लिंक्डइन एक्सचा (ट्विटर) प्रतिस्पर्धी ठरणार आहे.

एक्स (ट्विटर) वापरकर्ते जॉब सर्च टूल हा फिचर लाँच केल्यानंतर तुम्ही जाहीर केलेल्या लिस्टमधून नोकरी शोधू शकता. पण, नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिसऱ्या पार्टीची मदत घेतली जाईल. तसेच एक्सने (ट्विटर) पोस्ट केलेल्या माहितीनुसार एलॉन मस्कच्या काही प्रसिद्ध कंपन्यांमधे नोकरीच्या संधी उपलबध आहेत. तसेच एक्स (ट्विटर) ‘जॉब कार्ड्स’ यांचा उपयोग करणार आहे, त्यामुळे भविष्यातील अपडेटमध्ये वैयक्तिक सूची अधिक सहजपणे शेअर करता येईल. एलॉन मस्कला एक्सचे (ट्विटर) रूपांतर “एव्हरीथिंग ॲप”मध्ये करण्याच्या मोठ्या महत्वाकांक्षेचा ‘जॉब सर्च टूल’ हा फिचर एक भाग आहे, तर आता लवकरच एक्स (ट्विटर) युजर्ससाठी ‘जॉब सर्च टूल’ घेऊन येणार आहे आणि युजर्सना नोकरीच्या संधी उपलबद्ध करून देणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Elon musk will now make the job search tool feature on the x platform available to all users asp

First published on: 18-11-2023 at 18:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×