scorecardresearch

Premium

Facebook ने लॉन्च केले भन्नाट फिचर; व्हिडीओ अपलोड आणि एडिट करणे होणार सोपे

गेल्या वर्षी फेसबुकने शॉपिंग आणि गेम स्ट्रीमिंगसारखी लाईव्ह व्हिडीओ प्रॉडक्ट्स देखील बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

facebook announced video tab feature
फेसबुकचे नवीन व्हिडीओ फिचर (Image Credit -Reuters )

Facebook हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटा आहे. याचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे आहेत. फेसबुक आपल्या युजर्ससाठी अनेक फीचर्स लॉन्च करत असते. आता फेसबुकने YouTube आणि TikTok सह स्पर्धा करण्यासाठी एडिटिंगपासून ते डिस्कव्हरीपर्यंत नवीन व्हिडिओशी संबंधित फीचर्सची घोषणा केली आहे. तसेच कंपनी आपले सर्व व्हिडीओ एकाच ठिकाणी एकत्रित करण्यासाठी त्याच्या “वॉच” टॅबचे नाव “व्हिडिओ” टॅब असे करत आहे.

कंपनी मुख्य फिडसाठी रिल्ससाठी एडिटिंग टूलला व्हिडिओमध्ये पोर्ट करत आहे. याप्रकारे वापरकर्ते एकाच ठिकाणाहून लहान किंवा मोठे व्हिडीओ तयार करू शकतात. मेटा हे टॉल्स मेटा बिझनेस युजर्ससाठी आधीच आणत आहे. कंपनी स्पीड कंट्रोल, रिव्हर्स किंवा क्लिप चेंज करणे अशा स्वरूपाची अतिरिक्त एडिटिंग टूल्स आणत आहे. मेटा रिल्सवर HDR व्हिडीओसाठी सपोर्ट लॉन्च करत आहे. याबाबतचे वृत्त techcrunch ने दिले आहे.

passenger dancing in a train video went viral Northern Railway gave valuable advice
ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या प्रवाशाचा Video झाला व्हायरल; उत्तर रेल्वेने दिला मोलाचा सल्ला…
१०४ वर्षाच्या आजीने केलं स्काय डायव्हिंगच
‘वय हा फक्त आकाडाच!” १०४ वर्षाच्या आजीने केलं स्काय डायव्हिंग; जागतिक विक्रम मोडण्याचा केला प्रयत्न
5 new flagship smartphones
नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? २०० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह ‘हे’ आहेत बेस्ट फोन्स, जाणून घ्या
Chandrayan 3
Chandrayaan 3 बद्दल मोठी अपडेट! झोपलेल्या ‘प्रज्ञान-विक्रम’ला जागं करण्याचा ISRO चा प्रयत्न, पुढे काय झालं?

हेही वाचा : iPhone 15 लॉन्च होण्यापूर्वी ‘या’ प्लॅटफॉर्मवर मिळतोय आयफोन १३ आणि १४ सिरीजवर भरघोस डिस्काउंट

ऑडिओसाठी फेसबुक ऑडिओ ट्रॅक शोधणे, आवाज कमी करणे आणि व्हिडिओवर व्हॉइसओव्हर रेकॉर्ड हे सोपे करत आहे. फेसबुक आपल्या ”वॉच” टॅबला ‘व्हिडीओ’ मध्ये रीब्रँड करत आहे. ज्यामध्ये आता रिल्सपासून लॉन्ग फॉर्म कंटेंट आणि लाइव्ह व्हिडीओपर्यंत सर्व व्हिज्युअल कंटेंटचा समावेश असणार आहे. युजर्स एका व्हिडीओवरून दुसऱ्या व्हिडीओवर जाण्यासाठी स्क्रोल करण्यास सक्षम असतील. व्हिडीओ टॅब हा अँड्रॉइड App च्या वरच्या भागास आणि iOs वर खालील बाजूस असेल.

फेसबुकने युट्युबच्या यशाला उत्तर म्हणून २०१८ मध्ये फेसबुक वॉच लॉन्च केले. मात्र त्यानं अनेक बदल झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीस कंपनीने मूळ प्रोग्रामिंग विभाग पण बंद केला. गेल्या वर्षी फेसबुकने शॉपिंग आणि गेम स्ट्रीमिंगसारखी लाईव्ह व्हिडीओ प्रॉडक्ट्स देखील बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Facebook upgrade video feature discovery and editing tools for video check details tmb 01

First published on: 19-07-2023 at 10:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×