scorecardresearch

तब्बल चार वर्षांनंतर भारतीय बाजारात गुगलचा डंका वाजणार; सादर करणार ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन ; किंमत आहे फक्त…

गुगलने अलीकडेच, भारतात Pixel 6a लाँच केला आहे.

तब्बल चार वर्षांनंतर भारतीय बाजारात गुगलचा डंका वाजणार; सादर करणार ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन ; किंमत आहे फक्त…
Photo – indianexpress

गुगलद्वारे नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जातात. आता लवकरच गुगल येत्या ऑक्टोबरमध्ये आपली गुगल पिक्सेल ७ सीरिज लाँच करणार आहे. कंपनी या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन लाँच करू शकते. दोन्ही हँडसेटमध्ये अप्रतिम फीचर्स पाहायला मिळतात. या सीरीजसोबत कंपनी पिक्सेल वॉच देखील लाँच करण्याची शक्यता आहे.

अलीकडेच, कंपनीने भारतात Pixel 6a लाँच केला आहे. गुगल लवकरच आपला नवीन पिक्सेल स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी पुढील महिन्याच्या सुरुवातीला पिक्सेल ७ आणि पिक्सेल ७ प्रो लाँच करत आहे. दोन्ही स्मार्टफोन पिक्सेल ६-सीरीजचे उत्तराधिकारी म्हणून येतील. जवळपास चार वर्षे गुगलने आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतीय बाजारापासून दूर ठेवले. गुगल इंडियाने ट्विट करून याची पुष्टी केली आहे. म्हणजेच, यावेळी गुगल ग्लोबल लाँच सोबतच भारतातही आपले डिव्हाइस सादर करणार आहे. कंपनीने अलीकडेच भारतात गुगल पिक्सेल ६ए लाँच केले आहे, जे आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत फ्लिपकार्ट सेलमध्ये उपलब्ध असेल.

आणखी वाचा : भारतात Honor ची दमदार एन्ट्री! लाँच केला ‘हा’ नवीन टॅबलेट; जाणून घ्या किंमत

गुगल पिक्सेल ७ सीरिज या दिवशी लाँच होणार

गुगलचा हा इव्हेंट ६ ऑक्टोबर २०२२ रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. हा कार्यक्रम यूट्यूब आणि कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंटवर लाईव्ह पाहता येणार आहे.  कंपनी दोन्ही स्मार्टफोन्ससोबत पिक्सेल वॉच देखील लॉन्च करू शकते. कंपनीने अलीकडेच या डिवाइसेसचा एक YouTube व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यानुसार कंपनी पिक्सेल ७ प्रो ची प्री-ऑर्डर देखील सुरू करणार आहे. Google ने मे महिन्यात झालेल्या Google I/O कार्यक्रमात या फोनचे फोटो शेअर केले होते.

गुगल इंडियाने केले ट्विट

गुगल इंडियाने आगामी स्मार्टफोन सीरिजबद्दल ट्विट केले आहे, जे भारतात पिक्सेल ७ आणि पिक्सेल ७ प्रो लाँच करण्याची पुष्टी करते. कंपनीने गेल्या वर्षी भारतात लाँच केलेली पिक्सेल ६ सीरीज सादर केलेली नाही. तथापि, कंपनीने निश्चितपणे भारतात पिक्सेल ३ ए सादर केला आहे. जो या वर्षाच्या सुरुवातीला सादर करण्यात आला होता. हा हँडसेट आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. ४३,९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केलेला हा फोन फ्लिपकार्टच्या आगामी सेलमध्ये २७,६९० रुपयांना उपलब्ध होईल. कंपनीने ते फक्त एकाच व्हेरियंट सादर केले आहे.

आणखी वाचा : Realme 10 सीरीजमुळे बाजारपेठेत उडाली खळबळ; ‘हा’ आहे कंपनीचा नवा प्लान! जाणून घ्या एका क्लिकवर

असा असेल गुगलचा पहिला स्मार्टफोन 

गुगल येत्या ऑक्टोबरमध्ये पिक्सेल सीरिजच्या स्मार्टफोनबरोबर पिक्सेल वॉच स्मार्टवॉच लाँच करणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत पिक्सेल वॉचची काही फोटो पाहायला मिळाली, त्यानुसार पिक्सेल वॉचमध्ये गोल डिस्प्ले आणि मेटल फ्रेमसह स्लिम बेझल्स असतील  हे स्मार्टवॉच WearOS UI वर काम करेल आणि त्यात नेव्हिगेशन आणि स्मार्ट नोटिफिकेशन्स सारखे फिचर्स देखील पाहायला मिळतील. याशिवाय, या स्मार्टवॉचमध्ये हेल्थ आणि फिटनेस मॉनिटरिंग फिचर्चदेखील पाहायला मिळतील.   

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या