IRCTC Ticket Booking Rule : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर जाणून घ्या की रेल्वे तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) तिकीट बुक करणाऱ्यांना मोठी सुविधा देत आहे. नवीन नियमानुसार, आता तुम्ही एका महिन्यात पूर्वीपेक्षा जास्त तिकिटे बुक करू शकता. जर तुम्ही तुमचे आधार कार्ड आयआरसीटीसी शी लिंक केले असेल, तर तुम्हाला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. रेल्वेने हा नवीन नियम केला आहे.

आतापर्यंत आपण आयआरसीटीसी खात्यातून एका महिन्यात जास्तीत जास्त ६ तिकिटे ऑनलाइन बुक करू शकत होतो. परंतु आता तुम्ही एका महिन्यात १२ तिकिटे बुक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड आयआरसीटीसी खात्याशी लिंक करावे लागेल. आयआरसीटीसी खात्याशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. जाणून घेऊया आयआरसीटीसी खात्याशी आधार लिंक कसे करावे.

Netflix ला बसला जबरदस्त धक्का! गेल्या ३ महिन्यात गमावले ‘इतके’ ग्राहक; जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयआरसीटीसी खात्याशी आधार लिंक कसे करावे?

  • यासाठी प्रथम आयआरसीटीसीच्या अधिकृत ई-तिकीटिंग वेबसाइट irctc.co.in वर जा.
  • आता यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • आता होम पेजवर दिसणार्‍या ‘माय अकाउंट सेक्शन’ वर जाऊन ‘आधार केवायसी’ वर क्लिक करा.
  • यानंतर पुढील पेजवर तुमचा आधार क्रमांक टाका आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा.
  • आता तुमच्या आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाका आणि पडताळणी करा.
  • आधारशी संबंधित माहिती पाहिल्यानंतर खाली लिहिलेल्या ‘व्हेरीफाय’ वर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल की केवायसी तपशील यशस्वीरित्या अपडेट झाला आहे.

तिकीट बुक करण्‍यासाठी, प्रवाशाने आधारशी आपले प्रोफाईल पडताळणे फार महत्वाचे आहे. हे मास्टर लिस्ट अंतर्गत ‘माय प्रोफाइल’ टॅबमध्ये दिलेले आहे. तिकीट बुक करण्यापूर्वी, येथे प्रवाशाचे नाव आणि आधार कार्ड तपशील देऊन मास्टर लिस्ट अपडेट करा.