scorecardresearch

‘Jio Phone 5G’ : किंमत झाली लीक; आणखी जाणून घ्या बरंच काही…  

रिलायन्स जीओ लवकरच आपला ५-जी स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. लाँच होण्याआधीच या फोनची किंमत समोर आली आहे.

‘Jio Phone 5G’ : किंमत झाली लीक; आणखी जाणून घ्या बरंच काही…  
Photo-financialexpress

पुढील महिन्यात भारतात ५-जी सेवा सुरु होणार असल्याची माहिती आहे.  रिलायन्स जीओ सर्वप्रथम ५-जी सेवा सुरु करू शकते. परंतु आता मात्र, भारतात ५-जी सेवा सुरु होण्याआधीच रिलायन्स जीओ ५-जी स्मार्टफोनची किंमत समोर आली आहे. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

जीओ ५-जी फोनचे  स्पेसिफिकेशन्स

जीओ ५-जी फोनमध्ये ६.५-इंचाचा HD LCD डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट ९०Hz असेल. त्याच वेळी, स्क्रीनचे रिझोल्यूशन १६००×७२० पिक्सेल असेल. याशिवाय, फोन स्नॅपड्रॅगन ४८० प्रोसेसर, ४ जीबी LPPDDR4X रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह सुसज्ज असेल.

त्याच वेळी, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या सेटअपचा प्राथमिक कॅमेरा १३MP असेल आणि २MP मॅक्रो सेन्सर दिला जाईल. त्याच वेळी, फोन Android १२ वर काम करू शकतो. याशिवाय फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८MP कॅमेरा असेल. त्याच वेळी, फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५,०००mAh बॅटरी दिली जाईल, ज्यामध्ये १८W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. कनेक्टिव्हिटी पर्यायांसाठी फोनमध्ये वाय-फाय आणि ब्लूटूथ सपोर्ट असेल.

आणखी वाचा : Vodafone Idea vs Reliance Jio: ३९९ रुपयांमध्ये कोणता प्लॅन बेस्ट? अनलिमिटेड कॉल्स आणि बरंच काही…

या फोनमध्ये प्रगती ओएस दिला जाऊ शकतो. या ऑपरेटिंग सिस्टमची निर्मिती Google नं खास भारतीय मोबाइल युजर्ससाठी केली आहे ज्यात भारतीय भाषांचा सपोर्ट देखील मिळतो. तसेच प्रोसेसिंगसाठी जीओ ५-जी फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८० चिपसेट दिला जाऊ शकतो.

किंमत

जीओ फोन ५-जी किंमत काउंटरपॉईंटच्या रिपोर्ट मधून समोर आली आहे. अहवालानुसार, रिलायन्स जीओचा ५-जी स्मार्टफोन भारतात ८ हजार ते १ हजार २०० रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाईल. ही किंमत पाहता असा अंदाज लावला जात आहे की जीओ फोन ५-जी एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये बाजारात येऊ शकतो. 

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या