सोशल मीडियावर असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत; ज्यांच्या मदतीने आपण अनेक गोष्टी शेअर करीत असतो. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी अनेक अ‍ॅप आहेत; जिथे आपण फिरायला गेलो की, फोटोज आणि व्हिडीओ पोस्ट करतो. पण, अनेकदा असं होतं की, आपल्याला सगळ्यात प्लॅटफॉर्मवर एकत्र फोटो टाकणं शक्य होत नाही आणि आपल्याला विविध अ‍ॅपवर जाऊन वेगवेगळे स्टेटस टाकावे लागतात. आता व्हॉट्सअ‍ॅप एक भन्नाट फीचर घेऊन येत आहे; ज्यात तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरून दुसऱ्या अ‍ॅपवरसुद्धा स्टेटस शेअर करू शकणार आहात.

व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही पोस्ट केलेले व्हिडीओ, फोटो तुम्ही आता इन्स्टाग्राम अ‍ॅपवरसुद्धा शेअर करू शकणार आहात. व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करीत आहे; ज्यामुळे युजर्स व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस अपडेट इन्स्टाग्रामवरसुद्धा शेअर करू शकतील. तुम्ही आता जसं इन्स्टाग्राम स्टोरीज फेसबुक स्टोरीजवर शेअर करू शकता अगदी त्याचप्रमाणे हे असेल. विशेष म्हणजे या फीचरवर सध्या काम चालू आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर हा पर्याय तुम्हाला कुठे दिसेल?

१. सगळ्यात पहिला सेटिंगमध्ये जा.
२. त्यानंतर प्रायव्हसी (Privacy) हा पर्याय निवडा.
३. त्यानंतर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा.
४. तुम्हाला स्टेटस प्रायव्हसी दिसेल.
५. त्याच्या खाली तुम्ही पोस्ट केलेले स्टेटस तुम्हाला कोणाला दाखवायचा आहे यासाठी तीन पर्याय तिथे दिसतील.
६. तर, त्याच्याच खाली ‘शेअर माय स्टेटस अपडेट्स ॲक्रॉस माय अकाउंट्स’ असा एक पर्याय दिसेल. तिथे फक्त फेसबुक हा पर्याय सध्या तरी उपलब्ध आहे. पण, काही दिवसांनी व्हॉट्सअ‍ॅप उपडेट झाल्यानंतर फेसबुकच्या खाली तुम्हाला इन्स्टाग्राम हा पर्यायसुद्धा दिसेल; जेणेकरून तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट केलेले स्टेटस फेसबुकबरोबर इन्स्टाग्रामवरसुद्धा अगदी सहज शेअर करू शकता.

हेही वाचा…टेलिग्रामचा अनुभव होणार अधिक मजेशीर! ‘हे’ शानदार फिचर्स होणार लाँच; जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर अपडेट झाल्यानंतर फेसबुक किंवा इन्स्टाग्राम स्टोरीजवर कोणते स्टेटस अपडेट करायचे हे ठरवण्याचे नियंत्रण वापरकर्त्याकडे असेल. कोणत्याही वेळी वापरकर्त्यांना सेटिंग ऑन किंवा ऑफ करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध असेल. व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड अ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर तुम्हाला हे फीचर दिसेल. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी हा पर्याय केव्हा आणि कधीपासून युजर्सना उपलब्ध होईल याची माहिती दिलेली नाही. पण, लवकरच हे फीचर वापरकर्त्यांसाठी आणले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.