टिकटॉक या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मप्रमाणे युट्यूबवर देखील शॉर्ट्सच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. म्हणजेच आता यूट्यूब शॉर्ट्सवरही जाहिराती लावता येणार आहेत. याआधी युट्यूबवर टिकटॉक सारख्या छोट्या व्हिडिओंचा ट्रेंड सुरू झाला होता. टिकटॉकमधील अनेक त्रुटींमुळे, भारत सरकारने २९ जून २०२० रोजी त्यावर बंदी घातली. त्यावेळी टिकटॉकसोबतच अनेक चायनीज अॅप्सवरही देशात बंदी घालण्यात आली होती.

यूट्यूब शॉर्ट्सवरील मॉनिटायझेशनमुळे युट्यूबवर स्वतःच्या चॅनेलवर कंटेन्ट प्रसिद्ध करणाऱ्यांना युट्यूबवरून अधिक पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. युट्युबने याआधीच ही नवी प्रक्रिया जाहीर केली होती. पण मोजक्याच युट्युबर्सना याचा फायदा मिळत होता. आता युट्यूब पार्टनर प्रोग्राम अंतर्गत शॉर्ट्स व्हिडिओ निर्मात्यांना त्याचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार युट्यूब लवकरच त्याच्या शॉर्ट व्हिडिओ फॉरमॅट युट्यूब शॉर्ट्ससाठी पार्टनर प्रोग्राम सुरू करू शकते.

आणखी वाचा : ‘सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सवर मोबाईल चार्ज करू नका कारण…’; ओडिशा पोलिसांचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युट्यूब शॉर्ट्समधून पैसे कमावण्याची प्रक्रिया

  • युट्यूब शॉर्ट्समधून कमाई करण्यासाठी यूट्यूबर्सना किमान १,००० सबस्क्राईबर असणे गरजेचे आहे.
  • यासह एका वर्षात ४,००० तासांचा वॉच टाइम असण्याची अट देखील पूर्ण करावी लागेल.
  • तसेच गेल्या ३ महिन्यांत १० मिलीअन किंवा त्याहून अधिक व्हू असलेल्या युट्यूबर्स देखील या मॉनिटायझेशनचा फायदा घेण्यासाठी पात्र असतील.
  • युट्युब ऍड शेअरिंग प्रक्रियेअंतर्गत रेवेन्युमधील ४५ टक्के क्रिएटर्सना आणि ५५ टक्के युट्यूबला मिळणार आहे.
  • युट्यूब स्वतःच्या वाटणीतील १० टक्के रेवेन्यु युट्यूब शॉर्ट्ससाठी वापरल्या जाणाऱ्या म्युझिकच्या क्रियेटर्सना देणार आहे.