वनप्लस कंपनीने नुकताच आपला ‘वनप्लस ओपन’ फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. २७ ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनचा सेल भारतात सुरु होणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी हा फोन भारतासह जगभरात लॉन्च झाला आहे. यामध्ये Qualcomm चा टॉप टिअर स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन २ चिपचा सपोर्ट देण्यात आला आहे. वनप्लसने लॉन्च केलेल्या फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत व सेल सुरु झाल्यानंतर खरेदीदारांना कोणकोणत्या ऑफर्स मिळणार आहेत, त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

OnePlus Open : फीचर्स

वनप्लस ओपनच्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये कॉम्पॅक्ट डिझाइन देण्यात आले आहे. फोनची उंची १५३.४ मिमी इतकी आहे. तर फोनचे वजन हे जवळपास २३९ ग्रॅम इतके आहे. तसेच एमराल्ड डस्कचे वजन जवळपास २४५ ग्रॅम इतके आहे. वनप्लस ओपननमध्ये वापरकर्त्यांना ७.८२ इंचाचा फ्लॅक्सि फ्लयुड AMOLED प्रायमरी डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा ब्राइटनेस २८०० नीट्स इतका आहे. याशिवाय डिस्प्लेचे रिझोल्युशन २४४० x २२६८ पिक्सेल इतके आहे. तसेच फोनचा बाहेरील डिस्प्ले हा ६.३१ इंचाचा डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्युशन २ के इतके आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच हा फोन नवीन OxygenOS १३.२ वर आधारित अँड्रॉइड १३ वर चालतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…
OnePlus introduces lifetime warranty against green line issue
Lifetime Warranty For Green Line : आता मोबाईलच्या स्क्रीनवर येणार नाही ‘ग्रीन लाइन’; OnePlus ने सर्व स्मार्टफोन्सला दिली लाईफटाइम वॉरंटी
Gang arrested for stealing mobile phones from shop in Lashkar area crime news Pune news
लष्कर भागातील दुकानातून मोबाइल चोरणारी टोळी गजाआड; दहा मोबाइल संच जप्त
vodafone sells 3 percent stake in indus tower
व्होडाफोनकडून इंडसमधील ३ टक्के हिस्सा विक्री
What is the reason for waiting so long for the OTP message print exp
‘ओटीपी’ संदेशासाठी जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार? कारण काय? परिणाम काय?
due to mobile use and of and less outdoor sports are causing myopia in many children
लहान मुलांमध्ये लघुदृष्टिदोष मोबाइलचा बेसुमार वापर; मैदानी खेळांचा कंटाळा

हेही वाचा : OnePlus Open launch Video: भारतात लॉन्च झाला फोल्डेबल स्मार्टफोन; सेल्फी कॅमेऱ्यामध्ये मिळणार फेस अनलॉकसह ‘हे’ फीचर्स, किंमत…

OnePlus Open : कॅमेरा

वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यामध्ये सोनीचा LYT-T808 ‘पिक्सेल स्टॅक्ड’ (Pixel Stacked) CMOS सेन्सर OIS सह येतो. तसेच यामध्ये ६४ मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा जोडण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वापरकर्त्यांना ६० FPS सह ४ के क्वालिटीमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करता येणार आहेत. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओसाठी २० मेगापिक्सलचा प्राथमिक व ३२ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा मिळणार आहे. फेस अनलॉक, नाइटस्केप सेल्फी, सेल्फी एचडीआर, टाइम लॅप्स, ड्युअल व्ह्यू व्हिडीओ आणि अन्य काही फीचर्स देण्यात आले आहेत.

वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ४,८०५ mAh क्षमतेची बॅटरी देण्यात अली आहे. तसेच याला ६७ W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनची बॅटरी ४२ मिनिटांमध्ये १ ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते असे कंपनीचे म्हणणे आहे. एकदा चार्ज केल्यास एका दिवसापेक्षा अधिक काळ वापरता येऊ शकतो. रिटेल बॉक्समध्ये ग्राहकांना एक चार्जर देखील मिळणार आहे.

हेही वाचा : OnePlus 12: लवकरच लॉन्च होणार वनप्लस १२ फ्लॅगशिप स्मार्टफोन, काय असणार खास? जाणून घ्या

वनप्लस ओपन फोल्डेबल स्मार्टफोन: किंमत आणि ऑफर्स

भारतात वनप्लस ओपनच्या १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,३९,९०० रुपये आहे. हा फोन वनप्लस ओपन फोल्डेबल फोन एमराल्ड डस्क (Emerald Dusk )आणि वोयजर ब्लॅक (Voyager Black) या दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. हा फोन वनप्लसची अधिकृत वेबसाईट आणि अमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. प्री-ऑर्डर आजपासून सुरु झाली आहे. उद्यापासून याची विक्री सुरु होईल. काही निवडक डिव्हाइसवर ८ हजारांचा ट्रेड इन बोनस आणि आयसीआयसीआय बँक व वनकार्ड इन्स्टंट बँकेच्या मार्फत व्यवहार केल्यास ५ हजारांचा डिस्काउंट मिळू शकतो.

Story img Loader