Poco X5 5G India Launch: मागच्या महिन्यामध्ये पोको कंपनीचा POCO X5 5G हा स्मार्टफोन जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आला. एका महिन्यामध्येच या नव्या स्मार्टफोनला ग्राहकांनी पसंती दर्शवली. मिळालेल्या प्रतिसादानंतर ही टेक कंपनी लवकरच भारतामध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्याची माहिती समोर आली आहे. हा स्मार्टफोन POCO X5 Pro 5G चे लाइट व्हर्जन असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोकोच्या नव्या स्मार्टफोनबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे.

POCO X5 5G स्मार्टफोन १४ मार्च रोजी भारतीय बाजारपेठांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. सध्या हा फोन निळ्या, काळ्या आणि हिरव्या रंगामध्ये भारताबाहेर उपलब्ध आहे. फोनमध्ये 8 GB रॅम + 256 GB स्टोअरेज, Snapdragon 695 प्रोसेसर आणि 48 Megapixel प्रायमरी सेंसर असे फीचर्स आहेत. परदेशांमध्ये पोकोच्या या स्मार्टफोनची किंमत २८९ डॉलर्स (भारतीय चलनानुसार २४,७०० रुपये इतकी आहे. भारतामध्ये लॉन्च झाल्यानंतर हा फोन २० हजार रुपयांमध्ये मिळू शकेल.

ग्लोबल व्हेरिएंटनुसार, Poco X5 5G मध्ये Android 12 आधारित MIUI 13 सह भारतीय बाजारपेठांमध्ये दाखल केला जाणार आहे. या फोनला 6.67 इंचाचा Full HD+ Almond डिस्प्ले आहे. याच्यासह 120Hz रिफ्रेश रेट (ज्यामध्ये 1080×2400 Pixel resolution) आहे. Snapdragon 695 प्रोसेसर, 8 GB LPDDR4X रॅम, 256GB पर्यंतचे UFS2.2 स्टोरेज या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत.

आणखी वाचा – Reliance Jio ने लॉन्च केली आणखी २७ शहरांमध्ये 5G सेवा; महाराष्ट्रातील ‘या’ शहरांचा आहे समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोकोच्या या नव्या फोनमध्ये 48 Megapixel प्रायमरी सेंसर, 8 Megapixel सेकेंडरी सेंसर आणि 2 Megapixel सेंसर यांचे मिळूव ट्रिपल रीअर कॅमेरा युनिट जोडण्यात आले आहेत. सेल्फीकरिता 16 Megapixel सेंसर आहे. फोनच्या सुरक्षेसाठी त्यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर ही सेवा आहे. याला 5,000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. भारतामध्ये लॉन्च होणाऱ्या POCO X5 5G मध्ये हे सर्व फीचर्स उपलब्ध असणार आहेत.