रिअलमी कंपनीने भारतात रिअलमी १२ प्रो सीरिज ५जी लाँच केली आहे; जी भारतातील पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेऱ्यासह सर्वांत आकर्षक प्रीमियम सीरिज ठरेल. या सीरिजमध्ये दोन डिव्हाइसचा समावेश आहे. १. रिअलमी १२ प्रो प्लस ५जी आणि २. रिअलमी १२ प्रो ५जी. हे दोन्ही डिव्हाइस ऑफलाइन खरेदीदारांसाठी काल २९ जानेवारीपासून प्री-बुकिंगसाठी आणि ऑनलाइन खरेदीदारांसाठी ३० जानेवारीपासून सुरुवातीच्या किमतीत २५,९९९ रुपयांना उपलब्ध असणार आहेत. तसेच ६ फेब्रुवारीपासून या सीरिजची पहिल्यांदा विक्री सुरू होईल.

रिअलमी १२ प्रो सीरिज ५जी हे एक पॉवरहाऊस आहे; जे ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. तसेच ही सीरिज केवळ फोटोग्राफीपुरतीच मर्यादित नाही; तर प्रीमियम डिझाइन आणि Flawless परफॉर्मन्सचादेखील यात समावेश आहे, असे रिअलमीच्या प्रवक्त्याने सीरिज लाँचदरम्यान सांगितले आहे.

eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting
१० की ११ एप्रिल, भारतात कधी दिसणार ‘ईद’चा चंद्र? भारतासह परदेशात कशाप्रकारे ठरवली जाते ‘ईद’ साजरी करण्याची तारीख?
Antarctica Post Office
भारतीय टपाल विभागाने रचला इतिहास; अंटार्क्टिकामध्ये सुरु केले नवे पोस्ट ऑफिस
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
Loksatta UPSC Key
यूपीएससी सूत्र : ब्लड कॅन्सरवरील ‘कार-टी सेल ट्रीटमेंट’ उपचार प्रणाली अन् भारतातील प्रदूषण, वाचा सविस्तर…

रिअलमी १२ प्रो प्लस ५जी सबमरीन ब्ल्यू, नेव्हिगेटर बेज व एक्सप्लोरर रेड या तीन रंगांमध्ये आणि ८जीबी प्लस १२८ जीबी २९,९९९ रुपये, ८जीबी प्लस २५६जीबी ३१,९९९ रुपये व १२जीबी प्लस २५६ जीबी ३३,९९९ रुपयांना अशा तीन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे.

तसेच रिअलमी १२ प्रो ५जी सबमरीन ब्ल्यू व नेव्हिगेटर बेज या दोन रंगांमध्ये आणि ८जीबी प्लस १२८जीबी २५,९९९ रुपये व ८जीबी प्लस २५६ जीबी २६,९९९ रुपये अशा दोन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध असतील.

हेही वाचा…गूगल मीट, झूमला व्हॉट्सॲप देणार टक्कर! युजर्ससाठी लाँच होणार ‘हे’ फीचर 

रिअलमी १२ प्रो प्लस फीचर्स :

रिअलमी १२ प्रो प्लसम फ्लॅगशिप 64MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा, 3X ऑप्टिकल झूम व 6X इन-सेन्सर झूमसह येतो. याचे १२०एचझेड Curved Vision डिस्प्लेसह सुसज्ज आहे. तसेच 67W SuperVOOC चार्जिंग मोठ्या 5000mAh बॅटरीसह उपलब्ध आहे. त्यात स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 चिपसेट आहे आणि डॉल्बी ॲटमॉसला सपोर्ट करते.

रिअलमी १२ प्रो फीचर्स :

रिअलमी १२ प्रो स्नॅपड्रॅगन ६ जेन १ चिपसेट, ३२एमपी टेलीफोटो कॅमेरा, ५०एमपी मुख्य कॅमेरा व ८एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरासह सुसज्ज आहे.