Reliance Jio या अनेक शहरांमध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. देशात ५ जी नेटवर्क सुरु करणारी ही पहिली टेलिकॉम कंपनी आहे. जिओ आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असते. सध्या अनेक ग्राहक जिओसिनेमावरून IPL २०२३ चा आनंद घेत आहेत. त्याच आयपीएलसाठी जिओ एक नवीन जबरदस्त रिचार्ज प्लॅन घेऊन आला आहे. त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

रिलायन्स जिओने अलीकडेच एक नवीन क्रिकेट प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन ९९९ रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहेत. हे फायदे कोणकोणते आहेत ते जाणून घेऊयात.

हेही वाचा : Airtel चा ‘हा’ रीचार्ज प्लॅन घालतोय धुमाकूळ, वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार…, जाणून घ्या महिन्याला किती येणार खर्च?

९९९ रुपयांचा जीओचा क्रिकेट प्लॅन

रिलायन्स जिओच्या या क्रिकेट प्लॅनची किंमत ९९९ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला दररोज ३ जीबी डेटा वापरायला मिळतो. रोज मिळणारा ३ जीबी डेटा संपल्यावर इंटरनेट स्पीड हा ६४ केबीपीएस इतका होतो. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ८४ दिवसांची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड कॉल्स करण्याची सुविधा तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळते. म्हणजेच वापरकर्ता देशभरामध्ये लोकल आणि एसटीडी व्हॉइस कॉल्स करू शकतात. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळणार आहे.

जिओच्या ९९९ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना जीओटीव्ही , जिओसिनेमा आणि जिओसिक्युरिटी व जिओक्लाऊडचे मोफत सब्स्क्रिप्सशन मिळते. ज्यांच्याकडे ५जी स्मार्टफोन आहे ते वापरकर्ते ५जी नेटवर्कचा आनंद घेऊ शकणार आहेत.

हेही वाचा : Mother’s Day 2023: ‘मदर्स डे’ निमित्त आईला गिफ्ट म्हणून देऊ शकता ‘हे’ बेस्ट गॅजेट्स, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय जिओकडे ३९९ रुपयांचासुद्धा एक क्रिकेट प्लॅन आहे. यामध्ये ३ जीबी डेटा वापरायला मिळतो. म्हणजेच महिन्याला ९० जीबी डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. जीओटीव्ही , जिओसिनेमा आणि जिओसिक्युरिटी व जिओक्लाऊडचे मोफत सब्स्क्रिप्सशन मिळते. ज्यांच्याकडे ५जी स्मार्टफोन आहे ते वापरकर्ते ५जी नेटवर्कचा आनंद घेऊ शकणार आहेत.