Samsung कंपनीने फेब्रुवारी महिन्यामध्ये आपली लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज Galaxy S23 लॉन्च केली होती. या सिरीजमध्ये सॅमसंगने Galaxy S23 Ultra, Galaxy S23+ आणि Galaxy S23 हे स्मार्टफोन लॉन्च केले होते. ही सिरीज भारतात ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. आता सॅमसंगने या स्मार्टफोन्सवर काही नवीन ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Samsung ने घोषणा केली आहे की Galaxy S23 Ultra च्या खरेदीवर ग्राहकांना १८,००० रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. तसेच यामध्ये नो-कॉस्ट ईएमआयची ऑफर देखील दिली जात आहे. या स्मार्टफोनमध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या र्फोनमधून नाईट फोटोग्राफी चांगल्या प्रकारे करता येते असे कंपनीचे म्हणणे आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! Infosys चे अध्यक्ष मोहित जोशी यांचा राजीनामा, आता ‘या’ कंपनीचे असणार सीईओ

याशिवाय वापरकर्ते ५,२०९ रुपये प्रति महिना भरून एक वर्षाच्या नो-कॉस्ट ईएमआयवे सुद्धा फोन खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये हा स्मार्टफोन खरेही केल्यास तुम्हाला १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे. या सर्व ऑफरमुळे फोनची किंमत ५९,९९९ रुपये इतकी होणार आहे. Galaxy S23 Ultra भारतात १,२४,९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. जुन्या फोनच्या एक्सचेंज ऑफरमध्ये ४७,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळू शकतो. याशिवाय HDFC बँकेच्या र्डवरून व्यवहार केल्यास तुम्हाला ८,००० रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत ही ५९,९९९ रुपये इतकी असेल.

Samsung Galaxy S23

Galaxy S23 आणि S23 Plus च्या खरेदीवर देखील तुम्हाला १३,००० रुपयांची सूट आणि एक वर्षाचा नो-कॉस्ट ईएमआय ऑफरचा लाभ घेता येईल. ३,१२५ रुपयांच्या किंमतीमध्ये हा फोन नो-कॉस्ट ईएमआय ऑफरसह देखील मिळू शकतो.Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus च्या खरेदीवर ग्राहकांना ८,००० रुपयांचा अतिरिक्त अपग्रेड बोनस देखील मिळणार आहे.

हेही वाचा : Russia-Ukraine युद्धविरामासाठी ChatGpt ने सांगितले विविध उपाय! शशी थरूर म्हणतात, “वेगवगेळी विचारसरणी …”

Galaxy S23 हा फोन भारतामध्ये ७४,९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. ही किंमत या फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ७९,९९९ रुपये आहे. हा फोन तुम्हाला Phantom Black, Lavender, Green आणि Cream colors या रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला होता.