भारतातील सर्वात मोठी क्रेडिट कार्ड कंपनी एसबीआय कार्डने भारतामधील ग्राहकांसाठी सप्टेंबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या उत्सवी पर्वात अनेक आकर्षक फेस्टिव्ह ऑफर उपलब्ध करून दिले आहेत. टियर १, टियर २, टियर ३ शहरांमध्ये १६०० पेक्षा अधिक ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यापाऱ्यांचा समावेश असून एसबीआय कार्डचा उद्देश आपल्या ग्राहकांसाठी खरेदी अनुभव अधिक लाभदायी करून उत्सवी धामधुमीत भर घालण्याचा आहे. इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, फॅशन आणि लाईफस्टाईल, ज्वेलरी, ट्रॅव्हल तसेच ऑनलाईन बाजारपेठा इत्यादींत लोकप्रिय वर्गवारीत विस्तृत स्वरूपाचे आनंददायक प्रस्ताव उपलब्ध असतील.

हा एक प्रकारचा ऑनलाइन शॉपिंग फेस्टिव्हल आहे, जो एसबीआय कार्डच्या रिटेल कार्डधारकांना कोणत्याही घरगुती ई-कॉमर्स वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करतो. 

आणखी वाचा : ऑनलाईन सेलमध्ये कंपन्यांना इतकी ऑफर देणे कसे परवडते? यातून नफा कसा कमावला जातो? जाणून घ्या

अमेझॉनसोबत एसबीआय कार्डची विशेष भागीदारी

फेस्टिव्ह ऑफर २०२२ करिता एसबीआय कार्ड ग्राहकांनी २६०० शहरांमध्ये ७० हून अधिक राष्ट्रीय तर १५५० प्रादेशिक व स्थानिक (हायपरलोकल) प्रस्तावांचा समावेश केलेला आहे. या फेस्टिव्ह ऑफरचा भाग म्हणून ग्राहकांना विविध भागीदार ब्रँड्सकडून २२.५ टक्के कॅशबॅकचा लाभ मिळणार आहे. ‘अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’करिता अमेझॉनसोबत एसबीआय कार्डची विशेष भागीदारी ही एसबीआय कार्ड ग्राहकांकरिता महत्त्वाच्या ऑफरपैकी एक ऑफर आहे.

३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत लाईव्ह

हा यावर्षीचा एक मोठा ऑनलाईन सेल इव्हेंट असेल, जो ३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत लाईव्ह असणार आहे. त्याशिवाय एसबीआय कार्ड आपल्या मौल्यवान ग्राहकांकरिता जवळपास २८ मुख्य जागतिक तसेच राष्ट्रीय ब्रँड्सकडून वैविध्यपूर्ण ऑफर घेऊन आले आहेत. यामध्ये फ्लिपकार्ट, सॅमसंग मोबाईल, रिलायन्स ट्रेंडस्, पॅंटलून्स, रेमंड्स, एलजी, सॅमसंग, सोनी, एचपी, मेक माय ट्रीप, गोआयबीबो, विशाल मेगा मार्ट, रिलायन्स ज्वेल्स, कॅरेटलेन, हिरो मोटर्स आणि तत्सम नामांकित ब्रँड्सचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसबीआय कार्डच्या फेस्टिव्ह ऑफर्सविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, SBI Card website ला भेट देता येईल.