scorecardresearch

नवीन वर्षात नवीन फोन घ्यायचा विचार करताय? मग २० हजारापेक्षा कमी किमतीचे ‘हे’ ऑप्शन बघाच!

बाजारात असे अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत जे कमी किमतीत आपल्याला उत्तमोत्तम फीचर्स प्रदान करतात. या फोनची किंमत २० हजारांपेक्षाही कमी आहे.

smartphones
बाजारातील वाढलेली स्पर्धा आणि किंमतीतील कपातीमुळे आपल्याला २० हजार रुपयांच्या श्रेणीत चांगला प्रोसेसर आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन सहज मिळू शकतो.

आजच्या काळात स्मार्टफोन ही एक दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळे स्मार्ट फीचर्स असलेले फोन घेणं आता प्रत्येकाच्याच खिश्याला परवडण्यासारखं आहे. सध्या बाजारात असे अनेक नवीन स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत ज्यांची किंमत कमी असली तरीही या फोनचे फीचर्स इतर अनेक महागड्या फोनच्या फीचर्सच्या बरोबरीचे आहेत. आज आपण अशाच काही स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया ज्यांची किंमत २० हजारांपेक्षाही कमी आहे.

शाओमी रेडमी नोट ११टी ५जी (Redmi Note 11T)

रेडमी नोट ११टी तीन प्रकारात उपलब्ध आहे; ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज, आणि ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज. या फोनला ५जी सपोर्ट आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा असून ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. यात ९०Hz पर्यंत रिफ्रेश रेट असून २४०० x १०८० रिझोल्यूशनसह ६.६ इंच फुल HD+ LCD पॅनेल आहे. यात ५०००mAh ची बॅटरी असून ३३W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. शाओमी रेडमी नोट ११टी ५जी ची किंमत १७,९९९ रुपयांपासून सुरु होते.

बहुप्रतिक्षित OnePlus 10 Proचा टीझर झाला लीक; ‘हे’ असतील फीचर्स

रियलमी ८ (Realme 8 5G)

या फोनमध्ये फक्त ५जी कनेक्टिव्हिटीच नाही तर याचबरोबर सुपर स्मूथ ९०Hz स्क्रीन देखील असून ३ कॅमेराचा सेटअप आहे. रियलमी ८ ५जी चा डिस्प्ले ६.५ इंचाचा आहे. तसेच या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आहे, त्यासोबत दोन २ मेगापिक्सलचे इतर कॅमेरे आहेत. त्याचबरोबर १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. रियलमी ८ ५जी मधील ५०००mAh बॅटरी १८W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत १५,४९९ रुपयांपासून सुरु होते.

मोटोरोला मोटो जी६० (Motorola Moto G60)

मोटोरोलाने मोटो जी६० ला एकाच ६ जीबी रॅम कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केलं आहे. हा असा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. यामध्ये मॅक्रो, डेप्थ आणि इतर सेन्सर आहेत. या फोन मध्ये १२०Hz हाय रिफ्रेश रेट असून याला ६.८ इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. यात ६०००mAh ची बॅटरी असून २०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनची किंमत १७,९९९ रुपये इतकी आहे.

रियलमी नारजो ३० (Realme Narzo 30 5G)

या फोनमध्ये मीडियाटेक डिमेंसिटी ७०० प्रोसेसर असून यात ६ जीबी रॅम आहे. ओव्हरलोड टाळण्यासाठी जर तुम्ही योग्य ग्राफिक्स सेटिंग्ज ठेवल्या तर हा प्रोसेसर आपल्याला फोनवर गेमिंगचा उत्तम अनुभव देतो. रियलमी नारजो ३० मध्ये ९०Hz रिफ्रेश दर असून याचा डिस्प्ले ६.५ इंच फुल HD+ LCD आहे. या फोनला ४८ मेगापिक्सेल कॅमेरासोबत एक ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. याचा १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरासुद्धा उत्तम आहे. यातील ५०००mAh बॅटरी १८W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या आकर्षक स्मार्टफोनची किंमत १३,४९९ रुपयांपासून सुरु होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2022 at 10:54 IST