Redmi K50i Price: स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. स्मार्टफोन कंपनी Xiaomi भारतात लवकरच आपली Redmi K60 सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे. परंतु ही सीरिज लाँच करण्याच्या आधीच कंपनीने Redmi K50i च्या किंमतीत कपात केली आहे. किंमतीत २००० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता सहा जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २३,९९९ रुपयांना आणि ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २६,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. नवीन किंमतीसह फोन Amazon आणि Xiaomi च्या अधिकृत साइटवर लिस्ट करण्यात आला आहे.

Redmi K50i मध्ये काय असेल खास

Redmi K50i ६.६-इंचाच्या IPS LCD डिस्प्लेसह देण्यात आला आहे. जो फुल HD+ रिझोल्यूशन आणि १४४Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. हे MediaTek Dimensity ८१०० chipset द्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे. स्टोरेजच्या बाबतीत, स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी अंतर्गत स्टोरेज देण्यात आली आहे.

(हे ही वाचा : अरे वा! झटपट चार्ज होणाऱ्या ‘या’ 5G स्मार्टफोनवर २० हजार रुपयांपर्यंतची सूट; जाणून घ्या खास ऑफर )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP53 रेटिंगसह यात ३.५ मिमी हे देण्यात आला आहे Redmi K50i मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये ६४ एमपी प्राथमिक सेन्सर, ८ एमपी वाइड-एंगल लेन्स आणि २ एमपी मॅक्रो सेन्सर आहे. Redmi K50i मध्ये ५,०८०mAh ची बॅटरी ६७W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.