सध्या मोबाइल ही काळाची गरज बनला आहे. 4G, 5G च्या या जगामध्ये लोकांना अपडेटेड राहण्यासाठी स्मार्टफोनची मदत घ्यावी लागत आहे. आपल्या देशात दर आठवड्याला नवनवीन कंपन्यांचे फोन लॉन्च होत असतात. हे महागडे फोन खरेदी करणे प्रत्येकाला जमेलच असे नाही. मग अशा वेळी काहीजण सेकेन्ड हॅंड पद्धतीने फोन विकत घेतात. अनेक वेबसाइट्सवर जुन्या, सेकेन्ड हॅंड फोन्सची खरेदी-विक्री केली जाते. बरेचदा अशा वेबसाइट्सवर लोकांची फसवणूकही होत असते. त्यामुळे असे व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.

सेकेन्ड हॅंड मोबाइल फोन विकत घेण्याआधी कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे हे समजणे आवश्यक असते. याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

फोनची स्क्रीन तपासून घ्यावी.

स्क्रीन हा प्रत्येक फोनचा सर्वात महत्त्वपूर्ण घटक असतो. त्यामुळे फोन खरेदी करताना स्क्रीन व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करावी. अनेकदा फोनला डुप्लिकेट स्क्रीन लावून फसवण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रकार घडू नये यासाठी फोनची स्क्रीन नीट तपासून घ्यावी.

नव्या चॅटबॉटमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात? या ‘२०’ क्षेत्रांमध्ये AI घेऊ शकतो माणसांची जागा

फोटो काढून कॅमेऱ्याची गुणवत्ता तपासावी.

सेकेन्ड हॅंड मोबाइल फोन खरेदी करताना त्याचा कॅमेरा नेहमी तपासून घ्यावा. यासाठी एखाद्या गोष्टीचा फोटो काढून पाहावा. सध्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला मुख्य आणि पुढच्या बाजूला सेल्फी असे दोन कॅमेरे असतात. या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये फोटो काढून त्यांची गुणवत्ता तपासावी.

फोनची एकूण स्थिती तपासून घ्यावी.

नेहमी सर्व भाग तपासून घेतल्यानंतरची मोबाइल फोन खरेदी करावा. हेडफोन, चार्जिंग सॉकेट्स देखील तपासून घ्यावे. जुनाट स्मार्टफोन्स घेणे टाळावे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने ग्राहक व्यवहार मंत्रालयाने लॉन्च केला नवा AI chatbot; ग्राहकांच्या सोयीसाठी घेतली जाणार तंत्रज्ञानाची मदत

वॉरंटीबाबत चौकशी करावी.

ऑनलाइन पद्धतीने सेकेन्ड हॅंड स्मार्टफोन विकत घेताना विक्रेत्याशी वॉरंटीबाबत चर्चा करावी. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हींपैकी कोणत्याही माध्यमातून फोन खरेदी केल्यापूर्वी त्याची वॉरंटी तपासावी. त्यासह फोनचे बिल घ्यायला विसरु नये. बिलमध्ये IMEI (International Mobile Equipment Identity) नंबरचा उल्लेख करण्यात आला आहे की नाही हे सुद्धा तपासावे.