जेव्हा शिवम कौशिक यांनी आपल्या नव्या अ‍ॅपबद्दल विचार करायला सुरुवात आली तेव्हा त्यांना एलजीबीटीक्यू समुदायातील लोकांना त्यांच्या पहिल्या डेटसाठी रेस्टॉरंट बुक करून त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याचा विचार मनात आला. “एलजीबीटीक्यू डेटिंग अ‍ॅप्सवर बरेच घोटाळेबाज आणि गट सक्रिय आहेत जे अशा लोकांना लुटतात आणि त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करतात.” असे ग्ली अ‍ॅपचे सह-संस्थापक शिवम कौशिक यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२० साली लॉंच झालेले ग्ली हे अ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करते. टिंडर (Tinder) आणि ग्राइंडर (Grindr) हे प्रतिस्पर्धी अ‍ॅप्स वापरकर्त्यांना ही सुविधा देण्यात अपयशी ठरले आहेत. ‘भारतात या समुदायात असे अनेक लोक आहेत जे अशा अ‍ॅप्सच्या माध्यमातून चुकीच्या लोकांना भेटले आहेत.’ शिवम कौशिक यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. जगभरात १३ मिलिअन मासिक वापरकर्ते असणाऱ्या ग्राइंडर या अ‍ॅपने, क्वीअर पुरुषांकरिता व्यासपीठ असे म्हणत या अ‍ॅपची सुरुवात केली. परंतु अलीकडे या अ‍ॅपवर शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ग्राइंडर सारखे व्यासपीठ हे समलिंगी पुरुषांसाठी आपला एकटेपणा, चिंता यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी तात्पुरते साधन आहे. या अ‍ॅपकडे कॅज्युअल डेटिंग अ‍ॅप म्हणून पहिले जाते. नक्कीच, अशी प्रकरणे देखील घडली आहेत ज्यात काही वापरकर्त्यांनी वास्तविक कनेक्शन निर्माण केले असून ते गंभीर नातेसंबंधात बदलले आहे.

हेही वाचा : Drone Delivery: आता ड्रोन करणार फूड डिलिव्हरी; ‘या’ पाच शहरात झाली यशस्वी चाचणी

शिवम कौशिक सांगतात, ग्ली अ‍ॅप हे अशा लोकांसाठी आहे जे खरे मित्र आणि नातेसंबंध प्रस्थापित करू इच्छित आहेत. “आम्ही तुम्हाला एक साथीदार शोधून देऊ त्याचबरोबर तुमच्या पहिल्या भेटीसाठी सुरक्षित रेस्टॉरंटची व्यवस्थाही करू.’ त्यांनी पुढे सांगितले. ओबेरॉय ग्रुप आणि मॅरियट इंटरनॅशनलसोबत काम केल्यानंतर कौशिक यांना त्यांच्या अ‍ॅपमध्ये डेटिंग आणि हॉस्पिटॅलिटी या सुविधा एकत्र आणायच्या होत्या. तुम्हाला योग्य मॅच मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या पहिल्या डेटसाठी त्याला घरी बोलावण्यापेक्षा किंवा त्याने सांगितलेल्या एखाद्या अनोळखी ठिकाणी जाण्यापेक्षा ग्ली अ‍ॅपवरून एक रेस्टॉरंट बुक करू शकता. रेस्टॉरंटमधील भेटीमुळे तुम्ही तुमच्यात केमिस्ट्री आहे का हे तपासू शकता आणि त्यानुसार नातेसंबंध पुढे न्यायचे किंवा नाहीत हे ठरवू शकता.

तेया शर्मा, रोहित शर्मा आणि अंकुर चावला यांच्यासोबत तयार केलेले शिवम कौशिक यांचे ग्ली हे अ‍ॅप आतापर्यंत ४५,००० जणांनी डाउनलोड केले असून या अ‍ॅपचे १५,००० मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. दरम्यान, या समुदायाबाबत कर्मचाऱ्यांना अधिक संवेदनशील बनवण्यासाठी ग्ली एलजीबीटीक्यू समुदायासाठी काम करणाऱ्या अतिथी या एनजीओची मदत घेत आहे. सध्या, बहुसंख्य वापरकर्ते टियर-1 आणि टियर-2 शहरांतील आहेत, असे कौशिक यांनी उघड केले.

हेही वाचा : टायटनचे EyeX Smart Glasses लॉंच; फिटनेस ट्रेकिंग, टच कंट्रोलसोबतच ‘हे’ असतील आकर्षक फीचर्स

वापरकर्त्यांचे वर्तन समजून घेण्यासाठी ग्ली कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करते आणि त्यानुसार योग्य मॅचची शिफारस करते. बनावट प्रोफाइल फिल्टर करण्यासाठी आणि वापरकर्त्यांना अशा प्रोफाईलची तक्रार करण्यासाठी देखील एक यंत्रणा आहे. “आम्ही प्रत्येकाला आमच्या अ‍ॅपवर सभ्य वर्तन करण्यास सांगतो, अन्यथा, त्यांना ब्लॉक केले जाते.’ असे कौशिक यांनी पुढे सांगितले.

हा प्रवास अत्यंत कठीण असला तरीही ग्ली अ‍ॅपने आतापर्यंत एक कोटी रुपये उभारले आहेत. “काहींना त्यांचे पैसे टाकणे सोयीचे वाटत नव्हते तर काहींना अ‍ॅपची वाढ पाहण्यासाठी काही महिने प्रतीक्षा करायची होती”, असे कौशिकने सांगितले. तसेच, समलिंगी जोडप्यांना भारतातील पब आणि कॅफेमध्ये प्रवेश करणे अद्याप कठीण वाटते हे लक्षात घेता, ग्ली कॅफे उघडण्याची दीर्घकालीन योजना असल्याचंही कौशिक यांनी सांगितले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This indian app helps same sex couples to book a restaurant for their first date pvp
First published on: 12-01-2022 at 14:36 IST