आजच्या काळात कुणीही असा नाही ज्याच्याकडे स्मार्टफोन नसेल. सध्या आपली बहुतांश कामे या एका स्मार्टफोनच्या मदतीने होतात. आपण आपल्या स्मार्टफोनवर खूपच अवलंबून आहोत, यामुळेच आपल्या फोनला काहीही होऊ नये असाच आपला प्रयत्न असतो. फोनची स्क्रीन जपण्यासाठी आपण त्यावर Tempered Glass लावतो. आज आपण अशा काही टेम्पर्ड ग्लासबद्दल जाणून घेऊया जे आपल्या फोनसाठी नुकसानदायक असून ते आपल्या फोनची स्क्रीन पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यास असमर्थ आहेत.

स्मार्टफोन खरेदी करताच सर्वात आधी केल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये फोन स्क्रीनवर टेम्पर्ड ग्लास बसवणे याचा देखील समावेश होतो. आपल्या स्मार्टफोनचा डिस्प्ले अतिशय नाजूक असतो आणि तो खराब झाल्यास अनेक वेळा फोन काम करणे बंद करतो. अशा परिस्थितीत, टेम्पर्ड ग्लास आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनचे संरक्षण करते आणि फोन पडला तरीही स्क्रीन क्रॅक होऊ देत नाही. परंतु असेही काही टेम्पर्ड ग्लास आहेत ज्यांचा वापर करणे आपल्या फोनसाठी घातक ठरू शकते.

Twitter चं ‘Edit’ फीचर म्हणजे ‘एप्रिल फुल प्रॅन्क’ की…? ट्विटरच्या ‘या’ उत्तराने नेटकरीही गोंधळले

जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर टेम्पर्ड ग्लास बसवणार असाल, तर पातळ काच असलेला टेम्पर्ड ग्लास कधीही घेऊ नये. पातळ काच असलेला टेम्पर्ड ग्लास तुमच्या डिस्प्लेला पूर्ण संरक्षण देत नाही कारण तो तितका मजबूत नसतो. जर पातळ टेम्पर्ड ग्लास लावलेला तुमचा फोन पडला, तर टेम्पर्ड ग्लास सोबतच फोनचा डिस्प्ले देखील क्रॅक होण्याची शक्यता असते.

त्यामुळे, तुमच्या स्मार्टफोनसाठी नेहमी ब्रँडेड टेम्पर्ड ग्लास निवडा जो जाड असेल आणि तुमच्या फोनच्या डिस्प्ले किंवा स्क्रीनचे संरक्षण करण्याचे काम उत्तम प्रकारे करू शकेल. चांगल्या गुणवत्तेचा टेम्पर्ड ग्लास लावल्याने, तुम्हाला फोनवर चांगला टच देखील मिळेल.