Check Payment History Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅप वापरताना युजरला चांगला अनुभव यावा आणि त्याची माहिती सुरक्षित राहावी यासाठी अलीकडे व्हॉट्सअ‍ॅपने अनेक फीचर्स सादर केले आहेत. डिलीट केलेला मेसेज परत दिसण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने Whatsapp Accidental Delete हे फीचर उपलब्ध केले. व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही पैसे देखील ट्रान्सफर करू शकता. यासाठी WhatsApp Pay हे फीचर उपलब्ध आहे.

WhatsApp Pay हे इनचॅट पेमेंट सेवा आहे. या फीचरद्वारे थेट बँक खात्यात पैसे पाठवता येतात. या फीचरद्वारे युजरला त्याच्या बँक खात्यातील जमा रक्कम तपासता येते, कोणत्याही पेमेंटची तक्रार करता येते आणि मागील व्यवहारांचा तपशील पाहता येतो. तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप पे द्वारे आतापर्यंत कोणाला पैसे पाठवले हे तपासायचे असल्यास पुढील स्टेप्स फॉलो करा.

Funny Slogan Written Behind Indian Trucks mothers love photo Goes Viral
“कितीही मोठे झालो तरी…” ट्रकच्या मागे लिहली भन्नाट शायरी; PHOTO पाहून कराल कौतुक
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
digit robot collapse after working 20 hours
२० तास काम करून Robot देखील थकून जमिनीवर कोसळला! ‘या’ व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा…
Student locked himself in room friends immediately called police
VIDEO: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणानं २ तास दार उघडलं नाही; मित्रांनी बोलवले पोलीस अन्..शेवट पाहून व्हाल लोटपोट

(डॉक्टरने प्रेस्क्रिप्शनवर काय लिहिले हे चटकन ओळखता येणार, Google करणार मदत, जाणून घ्या कसे?)

१) अँड्रॉइडमध्ये व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट हिस्ट्री अशी तपासा

  • अँड्रॉइड फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा.
  • ‘मोर ऑप्शन्स’वर क्लिक करा.
  • मेन्यूमध्ये ‘पेमेंट’ शोधा आणि नंतर ‘पेमेंट हिस्ट्री’वर क्लिक करा.
  • येथे टॅप केल्याने अ‍ॅपद्वारे केलेले तुमचे सर्व व्यवहार तुम्हाला दिसून येईल.

(अडचणीत असताना शेअर करता येईल Location, अँड्रॉइड युजर्स ‘असे’ वापरा हे फीचर)

२) आयफोनवर असे तपासा व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट हिस्ट्री

  • आयफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा.
  • आता सेटिंगवर क्लिक करा.
  • यामध्ये ‘पेमेंट’ पर्याय शोधा.
  • मागील व्यवहारांबद्दल तपशील मिळवण्यासाठी ‘पेमेंट हिस्ट्री’वर क्लिक करा.

(‘या’ 5 भन्नाट ट्रिक्स लक्षात ठेवा, Whatsapp वापरताना भरपूर कामी येतील)

अनधिकृत पेमेंट असल्यास काय करावे?

व्यवहारात तुम्हाला काही समस्या दिसून आल्यास तुम्ही प्लाटफॉर्मवर त्याची तक्रार करू शकता. तक्रारीची सद्यास्थिती जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

  • स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा.
  • आयफोनवर सेटिंग्स आणि अँड्रॉइडवर मोर ऑपशन्स या पर्यायावर क्लिक करा.
  • ‘पेमेंट’ आणि ‘पेमेंट हिस्ट्री’वर क्लिक करा.
  • ज्या व्यवहाराबाबत तक्रार केली त्याबाबत नवीन माहिती मिळवण्यासाठी त्यावर क्लिक करा.