टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीच्या चार अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामध्ये सीइओ पराग अग्रवाल यांचा समावेश होता. या निर्णयाचा नेटकरांना फारसा धक्का बसलेला नाही कारण ‘स्पॅम बोट अकाऊंट’च्या मुद्द्यावरून दिशाभूल केल्याचा आरोप मस्क यांनी अग्रवाल यांच्यावर जाहिररीत्या केला होता. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी अग्रवाल यांना दिलेल्या ट्विटच्या उत्तरात विष्ठेसाठी वापरला जाणारा ‘पूपइमोजी’ वापरला होता. त्याचवेळेस याची कल्पना आली होती की, मस्क यांनी कारभार हाती घेतला तर अग्रवाल यांचे भवितव्य टांगणीला असणार!
आणखी वाचा : “मला माझे ट्विटर अकाऊंट परत मिळाले तर…” कंगना रणौतचे स्पष्ट वक्तव्य
गेल्या वर्षी २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात अग्रवाल यांची नेमणूक ट्विटरच्या सीइओपदी करण्यात आली होती. सीइओ पदावरून पायउतार झालेल्या जॅक डोर्सी यांनी त्याप्रसंगी अग्रवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षावही केला होता. अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे पदवीधर आहेत. स्टॅनफर्ड विद्यापीठातून पीएचडी केल्यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्ट, याहू आणि एटी अॅण्ड टी लॅब्जमध्ये काम केले. २०११ मध्ये ते ट्विटरमध्ये येऊन दाखल झाले. २०१८ साली ते ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारीही झाले. मशीन लर्निंग आणि एआय -कृत्रिम बुद्धीमत्तेच्या संदर्भात त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने ट्विटरला वेगळ्या उंचीवर नेले.
आणखी वाचा : लोकमानस : गेलेली इभ्रत परत मिळेल का?
एप्रिल महिन्यात मस्क यांनी ट्विटरचे बहुतांश समभाग घेतल्यानंतर अग्रवाल यांनी त्यांचे स्वागतच केले होते. त्याप्रसंगी केलेल्या ट्विटमध्ये अग्रवाल म्हणतात, ‘हे सांगताना मला अतीव आनंद होत आहे की, आमच्या संचालक मंडळावर @elonmusk यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही आठवड्यांत त्यांच्याशी झालेल्या संवादानंतर मला खात्री आहे की, आमच्या संचालक मंडळासाठी ही मूल्यात्मक वाढ असणार आहे ‘
आणखी वाचा : ट्वीट संदेशांच्या नियमनासाठी मंडळ; इलॉन मस्क यांची घोषणा
त्याला उत्तरादाखल केलेल्या ट्विटमध्ये मस्क यांनी म्हटले होते की, ‘येत्या काही महिन्यामध्ये ट्विटरमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येतील, त्यासाठी मी पराग आणि ट्विटरचे संचालक मंडळ यांच्यासोबत काम करण्यासाठी आतुर आहे’ मात्र त्यानंतर मस्क यांचा मनसुबा बदलला आणि त्यांनी अधिग्रहणाच्या संदर्भातील ‘ऑफर घ्या किंवा सोडून द्या’ याच पद्धतीनेच हाताळली.
आणखी वाचा : विश्लेषण : ट्विटरची मालकी एलॉन मस्ककडे, आता पुढे काय? तुमचा डेटा सुरक्षित राहणार का?
एप्रिलअखेरीस मात्र अग्रवाल यांनी ट्विट केले की, सुरू असलेल्या गडबड गोंधळानंतरही कामावर लक्ष ठेऊन, तत्काळ गोष्टी हाताळणाऱ्या सहकाऱ्यांचा मला अभिमान आहे. ट्विटरच्या भल्यासाठीच हे सारे सुरू आहे. जिथे आवश्यकता भासेल तिथे सुधारणा करण्यात येतील.
मात्र तोपर्यंत हे स्पष्ट झाले होते की, ज्या पद्धतीने ट्विटरचे काम सुरू होते, त्यावर मस्क नाखुश होते. मे महिन्यात मस्क यांनी भूमिका बदलली आणि ट्विटर अकाऊंटस् बद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. बहुतांश खातेधारक सदस्य हे बोगस असून कंपनीने हे मान्य न करणे हा अप्रामाणिकपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बोगस वापरकर्त्यांचा हा दावा फेटाळून लावताना अग्रवाल यांनी ट्विटर थ्रेड म्हणजेच सलग केलेल्या ट्विटस् चा वापर केला. इतर कुणालाही वापरकर्त्यांची अकाऊंटस दिसण्यापूर्वीच दररोज सुमारे पाच लाख अकाऊंटस् ट्विटरने डीलिट केलेली असतात. काही अकाऊंटस् स्पॅम असल्याच्या संशयावरून तात्पुरती बंद केलेली असतात, त्याची संख्याही काही लाखांमध्ये असते. पडताळणीच्या सर्व पायऱ्या या अकाऊंटनी पूर्ण केल्या नाहीत तर ही अकाऊंटस् कायमस्वरूपी बंद केली जातात, असे अग्रवाल यांनी या ट्विटर थ्रेडमध्ये म्हटले होते.
आणखी वाचा : ‘पक्षी मुक्त झाला..’ट्विटर ताब्यात घेताच मस्क यांची घोषणा!; पराग अग्रवाल यांच्यासह चार अधिकाऱ्यांची गच्छंती
कोणते अकाऊंट हे बोगस आहे, हे वरकरणी सांगणे फारच आव्हानात्मक असते. आमची टीम सातत्याने सिस्टिम अपडेट करून नियमांमध्येही सुयोग्य बदल करत असते. हे करत असताना नियमित वापरकर्त्यांना त्रास होणार नाही, याची काळजीही घ्यावी लागते. कारण पडताळणी अर्थात व्हेरिफिकेशनसाठी सतत कॅप्चा चौकोनात उत्तरे भरत राहणे हे कुणालाही न आवडणारे असते.
आणखी वाचा : Elon Musk Fired Parag Agrawal: नोकरी सोडताना भारतीय वंशाच्या अग्रवाल यांना मिळणार ३४५ कोटी; कारण…
बोगस वापरकर्त्यांच्या संदर्भात गेल्या चार तिमाहींमधील अंदाज हा पाच टक्क्यांपेक्षा अधिक नाही, असा आहे. त्यांना शोधण्यासाठी वापरण्यात आलेली प्रक्रिया हीदेखील कमीत कमी त्रुटी असलेलीच आहे. त्याचबळावर हे जाहीर विधान करत आहे, असे अग्रवाल यांनी म्हटले होते. मात्र धक्कादायक म्हणजे या ट्वीटला उत्तरादाखल मस्क यांनी विष्ठेसाठी वापरला जाणारा इमोजी पोस्ट केला. नेटकरांना तेव्हाच याचा जबरदस्त धक्का बसला होता. आणि अधिग्रहण झालेच तर अग्रवाल यांच्यावर गंडांतर येणार, हेही स्पष्ट झाले होते.
त्यानंतर मे महिन्यात अग्रवाल यांनी केय्वोन बेय्कपोर आणि ब्रूस फाल्क या दोघांना कंपनीतून डच्चू दिला आणि गरज भासल्यास उत्पादनाच्या गरजेसाठी असे आणखी निर्णय घेण्याची तयारी आहे, असेही त्यांनी जाहीर केले. त्याचवेळेस अग्रवाल यांच्यावर ‘प्रभाव नसलेला सीइओ’ असा आरोप झाला, त्यालाही त्यांनी जाहिररीत्या उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा : अक्षता मूर्ती आहेत तरी कोण?
४२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची भरपाई
अग्रवाल यांच्यासाठी ट्विटरमधील गच्छंतीही त्यांना तब्बल ४२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची भरपाई देऊन जाणार आहे. त्यांचे वर्षभराचे मूळ वेतन, समभागाची रक्कम आणि शिवाय काही भत्ते असे याचे स्वरूप आहे. सोमवारी अधिग्रहण कारवाई मस्क यांनी पूर्ण केली त्याचवेळेस अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, कंपनी खासगी करण्याचा मस्क यांचा डाव आहे, असी माहिती आता बाहेर येते आहे. एकूणात आता ट्विटरचा प्रवास खासगीकरणाच्या दिशेने होईल, असे चित्र आहे.