Twitter: जुनं फिचर बंद करून ट्विटर नव्या अपडेटच्या तयारीत; आता कंटेन्ट क्रिएटर्स पैसे…

तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवण्याचे स्त्रोतही विस्तृत होत आहेत.

Twitter-4
Twitter: जुनं फिचर बंद करून ट्विटर नव्या अपडेटच्या तयारीत; आता कंटेन्ट क्रिएटर्स पैसे…(Photo- Indian Express)

तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवण्याचे स्त्रोतही विस्तृत होत आहेत. आता मायक्रोब्लॉगिंग साइट ट्वीटर नवं टिपिंग फीचर आणण्याच्या तयारीत आहे. तुमच्या आवडत्या कंटेन्ट क्रिएटरला पैसे पाठवू शकता. मात्र हे फिचर सध्या तरी अँड्राइडसाठी असणार आहे. ट्विटरने Tip Jar फिचर या वर्षाच्या सुरुवातील लॉन्च केलं होतं. ट्विटरचा टिप जार हा एक मानेटायझेशनचा भाग होता. जर तुम्ही क्रिएटर असाल तर तुम्हाला प्रोफाइलमध्ये Bandcamp, Cash App, Patreon, Paypal आणि Venmo खाती जोडू शकता. त्यामुळे प्रोफाइलमध्ये टिप जारचं आयकॉन दिसणार आहे.,

ट्विटरने टिप जार फिचर पत्रकार, कंटेन्ट क्रिएटर्स यांच्यासाठी तयार केलं गेलं आहे. ज्याचं वय १८ पेक्षा अधिक अशीच व्यक्ती प्रोफाइलमध्ये टिप जार जोडू शकणार आहेत. येत्या काळात ट्विटरची टिप बिटकॉइनमध्ये दिली जाईल असंही बोललं जात आहे. टिप जार व्यतिरिक्त ट्विटरने आणखी एक मोठी घोषणा केली आहे आणि ती म्हणजे कंपनी आता Accelerated Mobile Pages (AMP) बंद करत आहे. ट्विटर Android आणि iOS दोन्हीसाठी AMP समर्थन बंद करत आहे. ते आधीच सुरू झाले आहे आणि या वर्षाच्या अखेरीस पूर्णपणे पूर्ण होईल.

इन्स्टाग्रामवर आता बॅगेज फिचर; क्रिएटर्स फॉलोअर्सकडून कमवू शकतात पैसे

दुसरीकडे, ट्विटरवर खाते नसलेल्यांसाठीही एक अपडेट जारी केलं आहे. ट्विटरवर खातं नाही मात्र ट्विटर स्पेसेसचा ऑडिओ ऐकू इच्छित आहे, अशांसाठी हे फिचर असणार आहे. नवीन अपडेटनंतर कोणीही थेट लिंकद्वारे स्पेस ऑडिओ ऐकू शकतात. पण ही लिंक स्पेन आयोजकाने शेअर केलेली असावी. नवीन अपडेटसह, खात्याशिवाय ट्विटर स्पेस ऑडिओ ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे, परंतु तुम्ही स्पेस ऑडिओमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. ट्विटर स्पेसमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे ट्विटर खाते असणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटर स्पेसने अँड्रॉइड आणि iOS वापरकर्त्यांसाठी लाइव्ह ऑडिओ सेशन्सचे फीचर जारी केले आहे. ट्विटरच्या स्पेस टीमने नवीन अपडेटबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Twitter introduce new tipping feature for android to earn money rmt