आजकाल सर्व पेमेंट्स युपीआयद्वारे सहजरित्या केले जातात. मॉलमधील शॉपिंग असो किंवा भाजी विक्रेत्याला पैसे देणे असो, सगळीकडे युपीआय पेमेंट उपलब्ध असते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ही सोय उपलब्ध झाली आहे, त्यामुळे घरबसल्या कोणतेही व्यवहार काही क्षणात करणे शक्य झाले आहे. पण या पेमेंट्स करताना आपल्याला इंटरनेटची गरज भासते. इंटरनेट नसेल तर कोणतेही पेमेंट करता येत नाही. पण इंटरनेटशिवाय देखील युपीआय पेमेंट करणे शक्य होऊ शकते , कसे ते जाणून घ्या.

युएसएसडी (USSD) तंत्र वापरून इंटरनेटशिवाय युपीआय पेमेंट करता येते. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स वापराव्या लागतील. हे तंत्र सर्वात आधी एनपीएल (NPCL) कडुन २०१२ मध्ये लाँच करण्यात आले होते. तेव्हा हे फक्त बीएसएनएल आणि एमटीएनएल या टेलिकॉम कंपन्यांसाठी उपलब्ध होते, पण आता सर्व कंपन्यांसाठी उपलब्ध आहे. ही टेकनिक वापरण्यापुर्वी तुम्हाला युपीआय सेटिंग बदलावी लागेल.

आणखी वाचा : Instagram वरचे लाईक्स आणि व्ह्यूज लपवता येणार; काय आहे ही ट्रिक लगेच जाणून घ्या

युपीआय सेटिंग बदलण्यासाठी या स्टेप्स वापरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये *99# हा नंबर डाईल करा.
  • तुम्हाला हवी ती भाषा निवडुन बँकेचे नाव किंवा आयएफएससी कोडचे सुरूवातीचे ४ नंबर टाका.
  • तुमच्या फोनशी जोडलेल्या सर्व अकाउंट्सची यादी दिसेल, त्यातील तुम्हाला कोणते अकाउंट वापरायचे आहे ते निवडा.
  • डेबिट कार्डचे शेवटचे ६ नंबर आणि एक्सपायरी डेट टाका.

इंटरनेटशिवाय युपीआय पेमेंट करण्यासाठी या स्टेप्स वापरा

  • *99# नंबर डाईल करुन पैसे पाठवण्यासाठी १ क्रमांकावर क्लिक करा.
  • त्यांनंतर ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्यांचा फोन नंबर, युपीआय आयडी, बँक अकाउंट नंबर टाका
  • त्यांनंतर सबमिट (Submit) पर्यायावर क्लिक करा.
  • अशाप्रकारे इंटरनेटशिवाय युपीआय पेमेंट करता येते. या पेमेंट्ससाठी काही पैसे आकारले जाण्याची शक्यता आहे.