मोबाईल उत्पादक कंपनी Vivo आपल्या नवीन मॉडेलवर काम करत आहे. विवोने पहिल्यांदा Vivo X80 आणि Vivo X80 Pro या वर्षी एप्रिलमध्ये चीनमध्ये सादर केले होते. काही महिन्यांनंतर, दोन्ही हँडसेट भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. आता कंपनी Vivo X90 लाइनअप लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन मॉडेलचे काम पूर्ण झालेले असून Vivo ही सिरिज डिसेंबर म्हणजे लाँच करण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सिरिजमध्ये Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro+ या मॉडेल्सचा समावेश असू शकतो. हा Vivo स्मार्टफोन Snapdragon 8Gen 2 चिपसेट सह बाजारात उपलब्ध होऊ शकतो.

आणखी वाचा : स्वस्तात मस्त ‘Redmi Writing Pad’ भारतीय बाजारपेठेत लाँच; किंमत फक्त…

Vivo X90 फीचर

Vivo X90 सिरीजमध्ये वक्र काठासह AMOLED डिस्प्ले असेल. फोनमधील चांगल्या कामगिरीसाठी, Snapdragon ८ Gen २ किंवा MediaTek चा फ्लॅगशिप प्रोसेसर मिळू शकतो. याशिवाय, हँडसेटमध्ये LPDDR5x रॅम, UFS ४.० स्टोरेज, ६४MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरी दिली जाऊ शकते. पण अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. Vivo X90 सिरिज मध्ये X सिरिज स्मार्टफोनपेक्षा अल्ट्रा-वाइड सेन्सर असू शकतो. या मॉडेल्सला अधिक आकर्षक बनवण्यासाठी यामध्ये १ इंच सेन्सर असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये १००W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४७८०mAh बॅटरी पॅक असू शकते.

किंमत

Vivo चा हा मोबाईल सध्या ५४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे. स्पेसिफिकेशन पाहता, स्मार्टफोन AMOLED स्क्रीनसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट १२०Hz आहे. यामध्ये MediaTek Dimensity ९००० चिपसेट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी मोबाईलमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo company will introduce mobile series in december pdb
First published on: 11-10-2022 at 16:08 IST