आजच्या युगात इंटरनेटशिवाय एक दिवसही जाणे अशक्य आहे. साधारणपणे, लोकांच्या घरात वायफाय असते आणि फोनमध्ये इंटरनेट पॅक नक्कीच असतो. तसेच टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या प्रचंड स्पर्धा सुरू आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वच कंपन्या विविध प्लॅन लॉन्च करत आहेत. यात व्होडाफोन आयडिया देखील मागे नाही. या कंपनीने एक डेटा व्हाउचर लॉन्च केले आहे. त्यात तुम्ही कुठेतरी बाहेर असाल आणि तुमचा मोबाईल डेटा संपत असेल, तर तुम्ही फक्त १९ रुपयांमध्ये फास्ट स्पीड इंटरनेट कसे मिळवू शकता, ते जाणून घेऊयात……

१९ रुपयांमध्ये मिळवा फास्ट स्पीड इंटरनेट

तुम्हाला येथे एका जबरदस्त डेटा व्हाउचरबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही लोकप्रिय खाजगी दूरसंचार कंपनी, व्होडाफोन आयडिया या कंपनी कडून खरेदी करू शकता. या डेटा व्हाउचरची किंमत फक्त १९ रुपये आहे आणि यासोबत १९ रुपयांच्या प्लॅन मध्ये तुम्हाला जबरदस्त स्पीडसह ४G इंटरनेट सेवा मिळेल.

Pebble company launches worlds slimmest Bluetooth calling smartwatch Royale with sleek and elegant design
‘या’ कंपनीने लाँच केलं सर्वात स्लिम स्मार्टवॉच; कॅलक्युलेटरपासून ते ब्लूटूथ कॉलिंगपर्यंत असणार फीचर्स खास
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
couple romance at noida delhi metro station
VIDEO : मेट्रो स्टेशनवर रोमान्स करताना दिसले कपल; एकमेकांना किस करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी संतापले
Indian driving license
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह तुम्ही ‘या’ ९ देशांमध्ये बिनधास्त वाहन चालवू शकता!

व्होडाफोन आयडियाच्या डेटा व्हाउचरचे फायदे

या 19 रुपयांच्या Vodafone Idea डेटा व्हाउचरमध्ये तुम्हाला व्होडाफोन आयडिया कंपनी कडून १GB हाय-स्पीड ४G डेटा दिला जाईल. हा डेटा व्हाउचर एका दिवसाच्या वैधतेसह येते. दरम्यान व्होडाफोन आयडिया कंपनीने (Vi) अनेक डेटा व्हाउचर देते, ज्यांची किंमत ४८ रुपये, ५८ रुपये आणि ९८ रुपये असे आहेत.

व्होडाफोन आयडियाच्या उर्वरित डेटा व्हाउचरबद्दल बोलायचे झाल्यास, ५८ रुपयांमध्ये तुम्हाला २१ दिवसांसाठी २GB इंटरनेट, ५८ रुपयांमध्ये तुम्ही २८ दिवसांसाठी ३GB डेटा मिळवू शकता आणि ९८ रुपयांमध्ये, कंपनी तुम्हाला २१ दिवसांसाठी ९GB इंटरनेट देते. या प्लॅन्सपैकी, व्होडाफोन आयडियाचा ५८ रूपयांचा प्लॅन सर्वात जास्त वैधता ऑफर करतो.

जिओ सुद्धा डेटा व्हाउचर देखील ऑफर करते, ज्याची किंमत १५ रुपये आहे. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्याला १GB ४G डेटा मिळतो आणि त्याची वैधता वापरकर्त्याच्या बेस प्लॅनसारखीच असते.