09 March 2021

News Flash

जेबीएल ऑन स्टेज फोर डॉक

स्टाईलमध्ये करा चार्ज, गाणीही ऐका लक्झरी म्हणजे केवळ छानछोकी नाही तर प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने सुविधांसह केलेली छानछोकी होय. स्मार्टफोनमध्ये आयफोनचा भाव आजही सर्वाधिक वधारलेलाच आहे. सॅमसंगने

| December 25, 2012 01:00 am

स्टाईलमध्ये करा चार्ज, गाणीही ऐका
लक्झरी म्हणजे केवळ छानछोकी नाही तर प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने सुविधांसह केलेली छानछोकी होय. स्मार्टफोनमध्ये आयफोनचा भाव आजही सर्वाधिक वधारलेलाच आहे. सॅमसंगने गॅलेक्सी एस थ्री आणि गॅलेक्सी नोटच्या माध्यमातून त्याला जागतिक स्तरावर स्पर्धाही निर्माण केली आहे. आयफोन आणि गॅलेक्सी नोट वापरणे हे आता स्टेटस सिम्बॉल झाले आहे. पण केवळ तेवढेच नाही तर त्यांच्यासाठी चांगले चार्जिग डॉक वापरणे त्यावर गाणी ऐकणे हेही स्टेटस सिम्बॉल ठरले आहे. या डॉकच्या दुनियेत सर्वाधिक आघाडीवर असलेली कंपनी आहे ती, जेबीएल.
जेबीएलचा ऑन स्टेज फोर हा चार्जिंग डॉक त्यापैकीच एक आहे. आयफोन- आयपॉड दोन्हीसाठी त्याचा वापर करता येईल. त्याचे डिझाईन अतिशय आकर्षक तर आहेच पण त्यामुळे ते चांगले आकर्षण म्हणून मिरवताही येते. त्याच्यावर असलेल्या एलइडी लाइटस्मुळे तर त्याला अधिक चार चाँद लागल्यासारखेच दिसते. जेबीएलच्या डॉकमधील या स्पीकर्सची रेंज अतिशय उत्तम असल्याने ते इनडोअर आणि आऊटडोअर दोन्हीसाठी उत्तम आहेत. त्यासाठी थेट वीजेचा वापरही करता येईल किंवा सहा डबलए बॅटरीजच्या माध्यमातूनही त्याला ऊर्जा पुरवता येईल.
याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे चार्जिंग करताना गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला जागेवरून उठण्याची गरज नाही, त्यासाठी तुमच्या हाती रिमोट कंट्रोल असेल. त्यावरून तुम्हाला मोबाईलवरील संगीत निवडता येईल. या डॉकचा वापर याशिवाय एमपीथ्री, सीडी प्लेअर, डेस्कटॉप, लॅपटॉप यांच्यासोबतही करण्याची सुविधा आहेच.
भारतीय बाजारपेठेतील किंमत :
रु. ७,९९९/-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 1:00 am

Web Title: jbl on stage for dock
टॅग : Tech It
Next Stories
1 स्मार्ट चॉइस : नोकिया आशा २०५ व नोकिया २०६
2 स्मार्ट चॉइस : पोर्टेबल संगीत
3 तुम्हीच ठरवा!
Just Now!
X