scorecardresearch

पूर्वअंतर्भूत सॉफ्टवेअर्सपासून धोका

उपकरण खरेदी केल्यावर त्याच्यामध्ये आपण इन्स्टॉल करत असलेल्या अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून आपल्या उपकरणात अ‍ॅडवेअर्स वगैरे जातात.

उपकरण खरेदी केल्यावर त्याच्यामध्ये आपण इन्स्टॉल करत असलेल्या अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून आपल्या उपकरणात अ‍ॅडवेअर्स वगैरे जातात. पण हेच अ‍ॅडवेअर्स पूर्वअंतर्भूत सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून जाऊ लागले तर तो मोठा धोका असू शकतो. येणाऱ्या काळात हा धोका खूप मोठा असेल अशी भीती क्विक हील टेक्नॉलॉजी लिमिटेडने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या तिमाहीतील भीती अहवालात व्यक्त केली आहे. पुढील तिमाहीत अशा प्रकारच्या अ‍ॅडवेअर्सकडून धोका असेल, असेही अहवालात नमूद केले आहे.
या अहवालामध्ये आयटी सुरक्षितता सातत्याने कशा प्रकारे विकसित होत आहे हेही नमूद केले आहे, तसेच मालवेअरचे नमुनेही वाढत असल्याचे आढळले आहे. अहवालात प्रमुख मालवेअर धोके, नमुने व िवडोज आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्म या दोन्हींचे आगामी ट्रेंड दिले आहेत. या अहवालाबाबत कंपनीचे सीटीओ संजय काटकर म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत आम्ही अँड्रॉइड व िवडोज या प्लॅटफॉर्मवर रॅन्समवेअर व अ‍ॅडवेअर कोसेसचे प्रमाण वाढत असल्याचे पाहिले आहे. अलीकडच्या काळात विविध फाइल फॉरमॅट आणि सोशल इंजिनीअिरग ट्रिक्समुळे रॅन्समवेअरमध्ये सुधारणा झाली आहे आणि जास्तीतजास्त जणांपर्यंत पोहोचण्यासाठी व परिणाम वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे.
प्रतिनिधी

क्विक हील थ्रेट रिपोर्ट पहिली तिमाही २०१५ मधील ठळक वैशिष्टय़े – अँड्रॉइड
* अँड्रॉइड अ‍ॅडवेअरचे नमुन्यांचे प्रमाण अधिक राहिले असून सापडलेल्या नमुन्यांच्या प्रकारामध्ये ५९% प्रमाण आहे.
* अँड्रॉइड अ‍ॅडवेअरचे १७ नवे प्रकार आढळले. त्यातून अधोरेखित होते की, अँड्रॉइड वापरकर्त्यांनी आपल्या उपकरणांवर आवश्यक ती काळजी घ्यायला हवी.
* पहिल्या तिमाहीत सर्वात प्रमुख अँड्रॉइड नमुना होता अँड्रॉइड.एअरपुश.जी. हा अँड्रॉइड अ‍ॅडवेअरचा एक प्रकार आहे.
* क्विक हील थ्रेट रिसर्च लॅबला २०१५ मधील पहिल्या तिमाहीत दरमहा ४,३०,००० अँड्रॉइडच्या अ‍ॅडवेअरचे नमुने मिळाले. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ते १८५% अधिक आहेत.
* अँड्रॉइड रॅन्समवेअर उपकरणांना उपद्रव देणे कायम राखणार आहे – लोकप्रिय रॅन्समवेअर अँड्रॉइड.सिम्पलॉकरचे चार नवे प्रकार आढळले.
* हॉट्सअ‍ॅपसारख्या लोकप्रिय संदेशवहन अ‍ॅप्लिकेशन्सवरील सोशल इंजिनीअिरग हल्ले येत्या काही महिन्यांत वाढतील. युजरनी फॉरवर्डेड मेसेज आणि इन्व्हिटेशन्सबाबत सावध राहावे.
* येत्या महिन्यांत बँकिंग क्रेडेन्शिअल्स आणि मोबाइल बँकिंग अ‍ॅप हल्लेखोरांच्या कक्षेत येऊ शकतात.

क्विक हील थ्रेट रिपोर्ट पहिली तिमाही २०१५ मधील ठळक वैशिष्टय़े – िवडोज
* सर्रास आढळणारे मालवेअर सापडले ते म्हणजे डब्लू३२.ऑटोरन.जेन, हा वॉर्म यूएसबी उपकरणांमार्फत पसरतो. यूएसबी उपकरणे संगणकाला जोडताना नेहमी स्कॅन करून घ्यावीत.
* अनेक केसेसमध्ये, बंडल्ड सॉफ्टवेअरमार्फत सिस्टीममध्ये येणारे आणि त्यानंतर ब्राउजर व सर्च इंजिन सेटिंग बदलताना पुढे वाटचाल करणारे िवडोज अ‍ॅडवेअरही आढळले. प्रोग्रॅम इन्स्टॉल करताना युजरनी काळजीपूर्वक बंडल्ड सॉफ्टवेअर तपासावे.
* या तिमाहीत रॅन्समवेअरनीही आगेकूच केली. सर्वाधिक अस्तित्व असलेला रॅन्समवेअर नमुना आढळला तो क्रिप्टोवॉल ३.०
* िवडोज प्लॅटफॉर्मवर, क्विक हील थ्रेट रिसर्च लॅब्सनी २०१५ मधील पहिल्या तिमाहीत दरमहा २.३ दशलक्ष मालवेअर नमुने शोधले.

मराठीतील सर्व Tech इट ( Techit ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या