कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांचे आदेश

कल्याण : मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे अनेक वेळा रस्त्यांच्या कोपऱ्यावर, दुभाजकांमध्ये असलेले लोखंडी फलक तुटून पडतात. हे फलक एखाद्या पादचारी, वाहनांवर पडले तर जीवित व वित्त हानी होण्याची भीती असते. त्यामुळे पालिकेने रस्त्याच्या मधोमध असलेले आणि वळणावर असलेले सर्व फलक काढून टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे.

गेल्या महिन्यात शिळफाटा रस्ता येथे चक्रीवादळाने दोन फलक रस्त्यावर पडले होते. यामध्ये एका वाहन चालकाला इजा झाली होती. पावसाळ्यात म्हणजेच पुढील चार महिन्यांत फलक पडून जीवित, वित्तीय हानी होऊ नये, यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रस्ता दुभाजकांमधील, धोकादायक वळण, कोपरे, गल्ल्यांमध्ये, वर्दळीच्या ठिकाणी असलेले सर्व फलक काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.