05 July 2020

News Flash

गुन्हेवृत्त

या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यालय फोडून सव्वा लाखांचा मुद्देमाल चोरीस
ठाणे : येथील पटेल फार्मा कार्यालयाच्या खिडकीवाटे प्रवेश करून चोरटय़ांनी सोमवारी रात्री दीड लाखाचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली आहे. मुंबईतील घाटकोपर येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाचे ठाणे पश्चिमेत भास्कर कॉलनीत सुचीपर्ण सोसायटीत पटेल फार्मा आहे. या बंद कार्यालयाचे खिडकीचे ग्रील तोडून चोरटय़ांनी कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील एक लाख ३६ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटय़ांनी चोरून नेला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन लाख ७८ हजाराची घरफोडी

कल्याण: पश्चिमेतील खडकपाडा परिसरात प्रज्ञाकिरण सोसायटीत घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. प्रज्ञाकिरण सोसायटीत राहणारे ज्ञानेश्वर करपे हे बाहेरगावी गेले असता चोरटय़ांनी त्यांच्या घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील एकूण २ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या
मंगळसुत्रावर चोरटय़ांचा डोळा

डोंबिवली : मंगळसूत्र चोरटय़ांनी आता रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांना लक्ष्य केले असून या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पूर्वेतील खंबाळपाडा येथील शिवाजी शेलार चाळीत राहणारी ४० वर्षीय महिला मंगळवारी सायंकाळी कल्याण शीळ रोडवरील कोळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरून रिक्षाने प्रवास करीत होत्या. याचवेळी रिक्षाच्या बाजूने आलेल्या एका मोटारसायकलस्वाराने त्यांच्या गळ्यावर जोराची थाप मारून त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी करून नेले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ लाखांना गंडा

कल्याण: पश्चिमेतील दत्त आळीतील लाड निवास येथे राहणाऱ्या गिरिजा घाग या महिलेला घर देण्याच्या बहाण्याने १२ लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. गौरीपाडा येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घर देण्याच्या बहाण्याने संतोष भावसार याने गिरिजा यांच्याकडून सात लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दोन चेक घेतले. ते पैसे परत न करता तसेच घरही न देता त्यांचे एकूण १२ लाखाला फसवणूक केल्याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनेवर बलात्कार करणाऱ्यास अटक
वसई : सुनेवर बलात्कार करणाऱ्या सासऱ्यास तुळिंज पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीचे नुकतेच लग्न झाले होते. ती पती आणि सासऱ्यासह नालासोपाऱ्यात राहत होती. ऑक्टोबर महिन्यात तिच्या सासऱ्याने घरात कुणी नसताना तिच्यावर बलात्कार केला होता. यानंतर तिने माहेरी जाऊन प्रकार सांगितला. त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सासऱ्याला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 12:55 am

Web Title: crime report in thane
Next Stories
1 ‘दिवाळी अंक म्हणजे साहित्यातील कल्पवृक्ष’
2 नसीरुद्दीन शाह यांच्याशी संवाद साधण्याची ठाणेकरांना संधी
3 ठाण्यातील उड्डाणपुलांची पूर्वतयारी सुरू
Just Now!
X