19 October 2019

News Flash

डोंबिवलीतल्या कॅरमपटूचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू

जान्हवीने २०१५ मध्ये राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत ज्युनिअर राज्य विजेतेपद मिळवून खेळाची सुरूवात केली होती

डोंबिवलीत रहाणाऱ्या जान्हवी मोरे या कॅरमपटूचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. पलावा सिटी सर्कल या ठिकाणी जान्हवी मोरेला डंपरची धडक बसली, ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यातच जान्हवीचा अंत झाला आहे. या घटनेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. रविवारी संध्याकाळच्या वेळी पलावा सिटी सर्कल या ठिकाणी जान्हवी मोरेला डंपरची धडक बसली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृदू स्वभाव आणि हसतमुख चेहरा असलेल्या जान्हवीचा असा अंत झाल्याची बातमी पसरली. जान्हवीला अखेरचा निरोप देण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईतल्या अनेक कॅरमपटूंनी हजेरी लावली होती. मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने मोरे कुटुंबीय शोकसागरात बुडालं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे. जान्हवीने २०१५ मध्ये राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत ज्युनिअर राज्य विजेतेपद मिळवून खेळाची सुरूवात केली होती. सब ज्युनिअर आणि ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत तिने महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्त्वही केलं होतं. काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमधल्या युवा गटात तिने कांस्य पदकही पटकावलं होतं. ती सीनियर गटातही चांगली कामगिरी करू लागली होती. मात्र तिच्या दुर्दैवी मृत्यूमुळे आपल्या राज्याने एक चांगला कॅरमपटू गमावला आहे.

 

First Published on May 13, 2019 8:52 pm

Web Title: national carrom player janhavi more died in road accident at palava circle dombivali