News Flash

एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिला चोप

'आयुक्त साहेब वेळ द्या' अशी घोषणाबाजी मनसे कार्यकर्त्यांनी केली.

परिवहन सेवेच्या उद्घाटनासाठी वसईत आलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. मात्र पोलिासंनी या कार्यकर्त्यांना बेदम चोप देत बाहेर काढले.

वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या उदघाटनासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे वसईत आले होते. मंगळवारी दुपारी वसईच्या वसंत नगरी मैदानात कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम सुरू असताना प्रेक्षकांत बसलेल्या दोन मनसे कार्यकर्त्यांनी अचानक उठून आयुक्त गंगाथरन डी. यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.

आयुक्त मनसे कार्यकर्त्यांना भेटत नसल्याने मनसेच्या आयुक्तांवर राग होता. त्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी या आंदोलनाची रणनिती आखली होती. ‘आयुक्त साहेब वेळ द्या’ अशी घोषणाबाजी मनसे कार्यकर्त्यांनी केली. या अनपेक्षित प्रकाराने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ धाव घेत या दोन्ही कार्यकर्त्यांना चोप देत बाहेर नेले. या नंतर पुढील कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात मनसे कार्यकर्ते गोंधळ घालणार असल्याचे पोलिसांना कुणकूण लागली होती. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह ३५ कार्यकर्त्यांना आधीत ताब्यात घेतलं होतं. तरी पोलिसांची नजर चुकवून दोन कार्यकर्ते कार्यक्रमात शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 6:34 pm

Web Title: police beat mns activist who try to disrupt the eknahth shinde function dmp 82
Next Stories
1 आजपासून लसीकरणाचा सराव
2 Coronavirus : दीड टक्क्यांहून कमी उपचाराधीन
3 उंबार्ली टेकडीवरील निसर्गसंपदा धोक्यात
Just Now!
X