29 September 2020

News Flash

खेळ मैदान : बदलापूरच्या श्रुतीचा अटकेपार झेंडा

बदलापूर येथे राहणाऱ्या श्रुती अमृते हिने वर्ल्ड टेबलटेनिस स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवला आहे.

प्रतिनिधी, ठाणे
बदलापूर येथे राहणाऱ्या श्रुती अमृते हिने वर्ल्ड टेबलटेनिस स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवला आहे. ही स्पर्धा इस्राइल येथे सुरू असून भारतीय संघाने पहिल्या पाचमध्ये येण्याचा मान पटकविला. ५-६ या गुणसंख्येने इंग्लंड संघाचा पराभव करत भारतीय संघाने पाचवा क्रमांक मिळवला आहे. ही स्पर्धा २ ते ८ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. भारतीय टेबलटेनिस संघातून खेळणारी श्रुती ही एकमेव खेळाडू आहे.

क्रिकेट शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी, ठाणे
संतोष अकादमीच्या वतीने क्रिकेट शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर १० एप्रिल ते २५ मेपर्यंत असून कल्याण येथील आधारवाडी क्रिकेट मैदान येथे होणार आहे. या शिबिरामध्ये ६ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहा गट तयार करण्यात येणार असून हे शिबीर सकाळी ७ ते १० व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत घेतले जाणार आहे.

राज्यस्तरीय डबल विकेट क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी, ठाणे
महाराष्ट्र डबल विकेट क्रिकेट संघटना आणि ठाणे जिल्हा संघटना यांच्या वतीने यंदा प्रथमच राज्यस्तरीय सब ज्युनिअर डबल विकेट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ व १३ एप्रिलला बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेच्या पटांगणात क्रिकेटचे हे सामने रंगणार आहेत. राज्यातील एकूण २२ संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. दिल्ली येथे १३ व १४ मे रोजी राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत, या वेळी महाराष्ट्र संघाची निवड राज्यस्तरीय स्पर्धामध्ये उत्कृ ष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमधून केली जाणार असल्याचे राज्य सचिव अशोक घोडके यांनी सांगितले.

बेसिक हॉर्स रायडिंग शिबीर उत्साहात
प्रतिनिधी, ठाणे
ठाणे जिल्हा साहसी क्रीडा असोसिएशन आणि सिद्धिविनायक युवा संस्था टिटवाळा यांच्या वतीने बेसिक हॉर्स रायडिंग कॅम्पचे २७ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर वांगणी येथे झाले. या शिबिरात ३० जणांनी सहभाग घेतला. घोडा हाताळण्यापासून ते घोडय़ावर बसणे तसेच घोडय़ाचा ताबा मिळवणे आदी कौशल्ये शिबिरामध्ये शिकविली. या शिबिरादरम्यान घोडा चालविणे किती अवघड आहे याची प्रचीती शिबिरार्थीना आली. या शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष विनायक कोळी यांनी पुढाकार घेतला होता.
संकलन :  भाग्यश्री प्रधान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 3:44 am

Web Title: sports event in thane 4
Next Stories
1 विठ्ठलवाडी आगाराचे उन्हाळी सुट्टीतील नियोजन कोलमडले
2 स्कायवॉक खुला, पण रेल्वे पूल बंद
3 सर्वधर्मियांसोबत हिंदू नववर्षांचे स्वागत
Just Now!
X