लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: येथील पूर्व भागातील कोळसेवाडीत एका रसवंती गृहात एका १५ वर्षाच्या मुलाला साप चावल्याने त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पालिका रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाने हा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर, मुलावर योग्य उपचार करण्यात आले आहेत. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात पाठविण्यात आले, असे रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम टिके यांनी सांगितले.

अमित सोनकर असे मयत मुलाचे नाव आहे. कोळसेवाडी मध्ये सोनकर कुटुंबीयांचे रसवंती गृह आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता अमित दुकानात बसला होता. खुर्चीखाली साप बसला आहे हे त्याच्या लक्षात आले नाही. अमितचा पाय सापाला लागताच त्याने त्याला दंश केला.

हेही वाचा… दिव्यात बेकायदा बांधकामे सुरूच, फेरीवाल्यांकडून हफ्ते वसुली होत असल्याचाही आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमितची प्रकृती ढासळू लागताच कुटुंबीयांनी त्याला कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. हळुहळू अमितची प्रकृती ढासळू लागताच रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या डाॅक्टरांनी अधिकच्या उपचारासाठी मुलाला कळवा येथे नेण्यास सांगितले. तेथे त्याचा मृत्यू झाला. अमितच्या मृत्यूला पालिका रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप सोनकर कुटुंबीयांनी केला आहे. तर, पालिका रुग्णालय व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळले आहेत