भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत एकूण १८३ बांधकामे ही अनधिकृत आहेत. प्रशासनाने केलेल्या प्रभाग निहाय सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे अश्या बांधकामाची यादी महापालिकेने पहिल्यांदाच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून नागरिकांना यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

मीरा भाईंदर हे झपाट्याने वाढणारे शहर आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथील घरांचे, दुकानांचे आणि जागेचे दर हे वाढत आहेत. याशिवाय वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील सुख-सुविधांमध्येदेखील भर पडू लागली आहे. याच गोष्टीचा गैरफायदा उचलत काही विकासक तसेच भूमाफिया शहरात अनधिकृत बांधकाम करत आहेत. अश्या बांधकामामुळे शहर विकासात बाधा निर्माण होत असून गरीब नागरिकांचीदेखील आर्थिक फसवणूक होत आहे.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Madhukar Kukde returns to BJP after 10 years
तब्बल १० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापासी
50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?

हेही वाचा – कल्याणमध्ये वाढत्या घरफोड्यांनी नागरिक हैराण

शहरातील अनधिकृत बांधकामावर रोख आण्यासाठी महापालिकेच्या स्थापनेपासूनच अतिक्रमण विभागाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय प्रभाग अधिकाऱ्यांना आपल्या प्रभागात कारवाईचे स्वतंत्र आदेश देण्यात आले आहे. मात्र मागील काही वर्षांत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्या कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शहरात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अश्या अस्तित्वात असलेल्या बांधकामामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून यांची यादी महापालिकेमार्फत प्रसिद्ध करण्याचे शासन आदेश आहे. मागील एकवीस वर्षांत प्रशासनाने ही यादी जाहीर करण्याकडे कानाडोळा केला होता.परंतु पालिका आयुक्तपदी संजय काटकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पालिकेच्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात सद्यस्थितीत सहा प्रभागांत एकूण १८३ बांधकामे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनधिकृत बांधकामांवर दंडात्मक कारवाई

मीरा भाईंदर शहरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेमार्फत कारवाई केली जाते. यासाठी प्रशासनाचे मनुष्यबळ व सामुग्री खर्ची करावी लागते. त्यामुळे हा भुर्दंड अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडूनच वसूल करावा, असा शासकीय ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार यापुढे हा दंड वसूल केला जाणार असल्याची माहिती आयुक्त संजय काटकर यांनी दिली.

हेही वाचा – कल्याण जवळील व्दारली येथे बेकायदा इमारत भुईसपाट, धूळ नियंत्रण यंत्राचा वापर

अनधिकृत बांधकामाची प्रभाग निहाय यादी

प्रभाग क्रमांक १ – ६
प्रभाग क्रमांक २ – १
प्रभाग क्रमांक ३ – ७८
प्रभाग क्रमांक ४ – ३२
प्रभाग क्रमांक ५ – ०८
प्रभाग क्रमांक ६- ५८