डोंबिवली- येथील पूर्व भागात राहत असलेल्या एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला सोमवारी एका २९ वर्षाच्या तरुणाने फूस लावून पळून नेले. या मुलीवर तरुणाने बलात्कार केला. टिळकनगर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी करताच पोलिसांनी तपास करुन मुलीला शोधले. मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी तरुणाविरुध्द बाल लैंगिक अत्याचार कायद्याने (पोक्सो) गुरुवारी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> कल्याण स्थानकातील रेल्वे मार्ग जलमय, लोकल सेवा अर्ध्या तासापेक्षा जास्त उशीराने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काशिनाथ रमेश पाटील असे तरुणाचे नाव आहे. तो त्रिमूर्ती झोपडपट्टीत राहतो. या तरुणाची पीडित मुलीची गेल्या वर्षी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. सोमवारी दुपारी पीडित मुलगी काही कामानिमित्त घराबाहेर पडली. ती घरी आली नाही. कुटुंबीयांना तिचा सर्वत्र शोध घेतला. ती सापडली नाही. टिळकनगर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, उपनिरीक्षक एम. पी. मुंजाळ यांनी घटना घडल्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. मुलीला एक जण डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे घेऊन जात असल्याचे आढळले. पोलिसांनी तपास करुन मुलीचा शोधले. पीडितेची पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. पीडित मुलीच्या आजीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तरुणा विरुध्द गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.